♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आत्मसात करा – भूषण मापारी

MH 28 News Live, लोणार : डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करा असे प्रतिपादन लोणार नगरपरिषदेचे गटनेते भूषण मापारी यांनी केले. १४ एप्रिल रोजी शहरातून निघालेल्या जयंती मिरवणुकीदरम्यान ते बोलत होते.

डॉ. बाबासाहेब यांना डोक्यावर न घेता आपण सर्वांनी डोक्यात घ्यावे व आपल्या देशाचा आपल्या समाजाचा व आपला विकास करावा असे ते म्हणाले. पुढे बोलताना मापारी म्हणाले की बाबासाहेब याचे विचार आपल्यामध्ये अमुलाग्रह बदल घडवू शकतात त्याचा विचार जिवंत ठेवणे ही काळाची गरज आहे.

शहरातून सायंकाळी ५ च्या सुमारास वाजत गाजत भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली ही मिरवणूक बौद्ध विहार येथून बस्सटेंड चौक मापारी वेटाळ जेनमंदिर प्रताप चौक येथून परत बौद्ध विहार येथे समारोप झाला
या वेळी जागोजागी फटाक्याच्या आतिष बाजीत मिरवणुकीचे जागोजागी स्वागत करण्यात आले.

या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. बळीराम मापारी, काँग्रेस तालुका अध्यक्ष राजेश मापारी, काँग्रेस जेष्ठ नेते साहेबराव पाटोळे, उपाध्यक्ष बादशाह खान, गटनेते भूषण मापारी, कृषी उत्पन बाजार समिती सभापती संतोष मापारी, नगरसेवक डॉ अनिल मापारी, शहर प्रमुख पांडुरंग सरकटे, प्रा गजानन खरात, इम्रान खान पठाण, नगरसेवक आबेद खान, शेख रउप शेख महेबूब, रमजान परसुवाले, अरुण जावळे, गणेश मापारी, सुधाकर मापारी, रोनक अली हाजी जमिल कुरेशी, बिलाल कुरेशी, हाशम कुरेशी, अशोक वारे, शंतनू मापारी पत्रकार संघाचे अध्यश शेख समद शेख अहमद, राहुल सरदार, संदीप मापारी, पवन शर्मा, रहेमान नोरंगाबादी, सचिन गोलेछा, वंचीतचे विनायक मापारी, आम आदमी पार्टीचे प्रा. वसंत मापारी आदींनी मिरवणुकीचे स्वागत केले. या वेळी महिला व बाल कल्याण सभापती जोत्सना सरदार, संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य रंगनाथ मोरे, किसन मोरे, गुलाबराव सरदार, कैलास अंभोरे, सिद्धार्थ अंभोरे, सुजित मोरे, सुरेश अंभोरे सर्जेराव मोरे सहसर्व समाज बांधव उपस्थित होते.

या वेळी इम्रान खान मित्र मंडळ यांच्या कडून पोलीस स्टेशन समोर शरबत तसेच पाण्याचे वाटप करण्यात आले. शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. बळीराम मापारी यांच्या कडून त्यांच्या निवासस्थाना समोर मिरवणूक येताच फटाक्याच्या आतिषबाजीत स्वागत करण्यात आले तसेच आईस्क्रीम व पाण्याचे वाटप करण्यात आले. या वेळी युवा सेना तालुका प्रमुख गजानन मापारी, राहुल मापारी प्रमोद मापारी, सुनील मापारी, ऋषिकेश मापारी आदी उपस्थित होते.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129