♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

विवेकानंद कृषी महाविद्यालयात माती परीक्षण प्रात्यक्षिकाचे आयोजन

MH 28 News Live, हिवराआश्रम : ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत विवेकानंद कृषी महाविद्यालयातील कृषिदूतांतर्फे नायगाव खुर्द येथे माती परीक्षण प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले. शेतकऱ्यांमध्ये माती परीक्षणसंबंधी जनजागृती व्हावी, यासाठी उपक्रम राबविण्यात आले आहेत.

यामध्ये पिके काढल्यानंतर किंवा पेरणीपूर्वी, रासायनिक खते देण्यापूर्वी किंवा खते दिल्यानंतर , माती परीक्षणानुसार खत व्यवस्थापन करावं, असा सल्ला कृषिदूतांनी शेतकऱ्यांना दिला.याबरोबरच शेतातील मातीचे नमुने गोळा करून त्याचे परीक्षण करण्यात आले. मातीमध्ये असणारे घटक, जमिनीचा सामू, मातीचा प्रकार याविषयी शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन देण्यात आले. गणेश सिरसाट, ऋषिकेश काळे, अरबाज शेख, आदिनाथ कुळकर्णी या कृषिदूतांनी मार्गदर्शन केले. या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. श्री. सुभाष कालवे , उपक्रमाचे अधिकारी प्रा. आकाश इरतकर प्रा.समाधान जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129