
चिखलीमध्ये चाकू हल्ला दोघे बाप लेक गंभीर जखमी; हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात
MH 28 News Live / चिखली : आपसातील वादाचा परिणाम हातघाईवर आलेल्या भांडणात झाला आणि एका युवकाने तिघांवर चाकू हल्ला केल्याची घटना चिखली शहरातील सुभाष नगर परिसरात ६ मे रोजी रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास घडली. या हल्ल्यात गंभीर झालेल्या दोघांना उपचारासाठी बुलढाणा येथे हलवण्यात आले असून सदर घटनेसंदर्भात चिखली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्याची कार्यवाही सुरू आहे.
याबाबत थोडक्यात माहिती अशी की पंचायत समिती कार्यालया मागील सुभाष नगर परिसरात आज रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. शेख जाबाज शे सुलेमान ( २३ ) या युवकाने शे बासीद शे खलील बागवान आणि ( २७ ) शे गनी, बागवान ( ७० ) आणि शे जुबेर शे गनी बागवान या तिघांवर चाकू हल्ला केला. या हल्ल्याचे कारण त्यांच्यातील आपसातल्या आपसातला वाद असल्याचे सांगितले जाते. या हल्ल्यात शे बासीद शेख खलील बागवान आणि शेख गणी बागवान हे दोघे गंभीर जखमी झाले त्यांना पुढील उपचारासाठी बुलढाणा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेण्यात आले असून हल्ल्यातील आरोपी शे जाबाज यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून याच्यावर पुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया चिखली पोलीस ठाण्यामध्ये सुरू झाली आहे.