♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

मनसेच्या वतीने आयोजित रक्तदान शिबीरामध्ये ९५ रक्तदात्यांनी केले रक्तदान

MH 28 News Live, चिखली : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना बुलडाणा जिल्ह्याच्या वतीने दि. १४ जून २०२२ रोजी मनसे जनसंपर्क कार्यालय चिखली येथे राज्य उपाध्यक्ष विठ्ठल लोखंडकार यांच्या प्रमुख उपस्थितीत रक्तदान शिबीर संपन्न झाले.रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान‘ असे समजले जाते. शहरातील विविध रुग्णालयांमध्ये आज काही प्रमाणात रक्तपेढींमधील साठा कमी पडू लागला आहे. याच अनुषंगाने तरुणाईमध्ये रक्तदानाचे महत्त्व रुजविणे आणि त्यांना रक्तदानासाठी प्रेरित करण्याच्या अनुषंगाने राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.

रक्तदान ही आजच्या काळाची गरज आहे. अनेकदा वेळेवर रक्त मिळत नसल्याने मृत्यू होण्याच्या घटना कानावर येतात. त्यामुळे तरुणाईने अधिका अधिक रक्तदान केले. शिबिरात जवळपास ९५ च्या वर रक्तदात्यांनी रक्तदान केले. त्याचप्रमाणे मनसे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांना दीर्घायुष्य लाभण्यासाठी चिखली शहराचे आराध्य दैवत श्री रेणुका मातेच्या चरणी पातळ अर्पण करण्यात आले त्यावेळी राज्य उपाध्यक्ष विठ्ठल लोखंडकार, जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे, उपजिल्हाध्यक्ष राजेश परिहार, तालुकाध्यक्ष विनोद खरपास, शेतकरी सेलचे जिल्हा संघटक शैलेश गोंधने, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष शैलेंद्र कापसे, शेतकरी सेलचे जिल्हाध्यक्ष प्रदीप भवर, उपतालुका अध्यक्ष संदीप नरवाडे, तालुका सचिव प्रवीण देशमुख, एकनाथ खरपास, मनविसे तालुकाध्यक्ष स्वप्निल आसोले, उपशहर अध्यक्ष रवी वानखेडे,संजय दळवी, समाधान म्हस्के,विभाग अध्यक्ष बंटी कळमकर, निशांत गायकवाड, सुनील ठेंग, शाखाध्यक्ष वैभव पडघान,सुनील चव्हाण ,ज्ञानेश्वर हाडे, उमेश भुतेकर, श्रीनाथ पवार, सतीश वैद्य, भावसिंग अवसरमोल, सिद्धू दिंडे, गजानन दांडगे पटू इंगळे शुभम बरबडे वैभव देहाडराय यांसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129