
बेरोजगार युवक युवतींनी रोजगार उभारायचाय.. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाचा लाभ घ्या
MH 28 News Live, बुलडाणा : उद्योग व्यवसाय क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या स्वयंरोजगार व रोजगाराच्या विविध संधी विचारात घेवुन उद्योजकतेला चालना देणारी व सर्जनशिलतेला कालानुरुप वाव देणारा सर्वसमावेश कार्यक्रम शासनाने ऑगष्ट 2019 पासुन मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम सुरु केलेला आहे. सन 2022-23 या आर्थिक वर्षात 50 लक्ष रूपये प्रकल्प मर्यादेपर्यंतचे उद्योग ग्रामीण भागात उभारण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या जिल्हा कार्यालयामार्फत अर्ज मागविण्यात येत आहे. बेरोजगार युवक युवतींना रोजगार उभारण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाचा आधार त्यांना मिळाला आहे.
राज्य शासनाच्या उद्योग मंत्रालयामार्फत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत ग्रामीण भागात व जिल्हा उद्योग केंद्रामार्फत शहरी भागात राबवण्यिात येत आहे. या योजनेतंर्गत उत्पादन प्रक्रिया असलेल्या उद्योगासाठी जास्तीत जास्त 50 लक्ष तर सेवा उद्योगासाइी 10 लक्ष रूपये मर्यादा आहे. या याजनेतंर्गत शहरी भागासाठी प्रकल्प किंमतीच्या 15 ते 25 टक्के तर ग्रामीण भागासाठी प्रकल्प किंमतीच्या 35 टक्के रक्कम मार्जिन मनी अनुदान स्वरूपात दिली जाते. उत्पादन प्रक्रिया असलेल्या व सेवा उद्योगासाठी प्रकल्प किंमत 5 लक्ष रूपयापेक्षा जास्त असेल तर किमान शैक्षणिक पात्रता इयत्ता 8 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अर्जदाराचे वय 18 ते 45 वर्ष दरम्यान असावे. नविन उद्योजक, कारागिर, संस्था व बचत गट या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत. या योजनेचा अर्ज ऑनलाईन स्वीकारल्या जात असून शासनाच्या https://maha-cmegp.gov.in संकेतस्थळावर अर्ज सादर करावा. तसेच योजनेची संपूर्ण माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. योजनेची अधिक माहितीसाठी खादी व ग्रामोद्योग मंडळाचे जिल्हा कार्यालय व सर्व तालुका कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी केले आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button