
शेतकऱ्यांनी आधुनिक शेती करून समृध्दी साधावी – आ. श्वेताताई महाले
MH 28 News Live, चिखली : परंपरागत शेती करण्याचे दिवस आता संपले आहे. परंपरागत शेती करताना कमी उत्पन्न आणि मेहनत जास्त अशी परीस्थिती निर्माण होते . त्यामुळे शेतकऱ्यांनी आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शेती करण्याकडे वळले पाहिजे असे प्रतिपादन कृषी विभाग चिखली मार्फत सावरगाव डुकरे येथे रुंद सरी वरंबा प्रात्यक्षिक करताना केले.
दि. 16 जून रोजी सावरगाव डुकरे येथे आ. श्वेताताई महाले यांच्या उपस्थितीत रुंद सरी वरंबा तंत्रज्ञान प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आलं होते. सदर प्रात्यक्षिकाबाबत उपविभागीय कृषी अधिकारी संतोष डाबरे यांनी सविस्तर माहिती दिली. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बीबीएफ द्वारे पेरणी करावी असा आव्हान संतोष डाबरे यांनी केले. आ. महाले यांनी सुद्धा उपस्थित शेतकऱ्यांना सदर तंत्रज्ञानाचा अवलंब जास्तीत जास्त करावा व उत्पन्न वाढवावे असे या प्रसंगी सांगितले. त्यानंतर खरीप पूर्व आढावा बैठक व पोखरा योजनेबाबत सभा घेण्यात आली व बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. अमोल शिंदे तालुका कृषी अधिकारी चिखली यांनी सोयाबीन अष्टसूत्री बाबत सविस्तर माहिती दिली. उपविभागीय कृषी अधिकारी संतोष डाबरे यांनी बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक करून दाखविले रुंद सरी वरंबा पद्धतीने पेरणी केल्यास पोकरा योजनेमधून प्रति हेक्टर एक हजार रुपये अनुदान मिळत असल्याने शेतकऱ्यांनी या यंत्राद्वारे पेरणी करणे बाबत मार्गदर्शन केले. त्याच बरोबर गटांनी अवजारे बँक साठी अर्ज सादर करावेत याबाबत सविस्तर माहिती दिली. अध्यक्षीय भाषणामध्ये आ. श्वेताताई महाले यांनी सदर प्रात्यक्षिक त्या राबवत असलेल्या समृद्ध शेतकरी अभियान अंतर्गत येत आहे. खरीपाच्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी पीक घेताना त्याला तंत्रज्ञानाची जोड देऊन अधिक उत्पन्न घ्या व आर्थिक उन्नती साधावी असे सांगितले. त्याच बरोबर सावरगाव मध्ये मंजूर केलेल्या विविध कामांबाबत त्यांनी माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन उपसरपंच यांनी केले. सदर कार्यक्रमास शंतनू पाटील यांनीसुद्धा मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमासाठी गावच्या सरपंच वर्षाताई पाटील, उपसरपंच, डॉक्टर कृष्णकुमार सपकाळ, मनोहर घोलप मंडळ कृषी अधिकारी चिखली, अनिताताई सोळंकी, राजूभाऊ आंभोरे, अरुण नाना , अरून पाटील, शिवराज पाटील, गावातील प्रतिष्ठित नागरिक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच कृषी विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.



