
हिरक महोत्सवी वर्षातील चिखली अर्बन बँकेची ६१ वी आमसभा १४ ऑगस्ट रोजी होणार
MH 28 News Live, चिखली : एकीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि दुसरीकडे चिखली अर्बन बँकेचे हिरक महोत्सवी वर्ष असा दुग्धशर्करा योग यावर्षी जुळून आला आहे. या दोन्ही महोत्सवी वर्षात बँकेला आपली वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्याचा देखील योग जुळून आलेला आहे. स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्या दिवशी म्हणजेच १४ ऑगस्ट २०२२ रोजी बँकेच्या ६१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
२३ सप्टेंबर १९६१ म्हणजेच अनंत चतुर्दशीच्या शुभ दिनी चिखली अर्बन बँकेने आपल्या कार्याला सुरुवात केली. १९६१ ते २०२२ अशा या सुवर्णमयी प्रवासाची ६१ वर्षे २३ सप्टेंबर २०२२ रोजी पूर्ण होत असून बँक आपले हिरक महोत्सवी वर्ष साजरेकरीत आहे.
बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दिवशी राष्ट्र कार्य व्हावे या उदात हेतूने सर्वसाधारण सभेची सुरुवात हि रक्तदानाने होणार आहे. समाजातील इच्छुक रक्तदाते, बँकेचे सभासद, ग्राहक व हितचिंतक यांनी मोठ्या प्रमाणावर रक्तदान करून या राष्ट्रकार्यात आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. याशिवाय १० वी मध्ये उत्तम गुणांनी उत्तीर्ण झालेल्या गुणानुक्रमे प्रथम १५ विद्यार्थ्याचा सत्कार व शिष्यवृत्ती च्या चेकचे वाटप देखील या वेळी बँकेकडून केल्या जाणार आहे. या शिवाय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त पंतप्रधानांनी केलेल्या घर घर तिरंगा या आवाहनाला प्रतिसाद देत महिला बचत गटाच्या माता भगिनी सभासदांना भारतीय ध्वजाचे वाटप वार्षिक सर्वसाधारण सभेच्या ठिकाणी करण्यात येणार आहे. चिखली अर्बन बँक दरवर्षी आपल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सामाजिक, शैक्षणीक, अध्यात्म, सहकार, क्रीडा, वैद्यकीय या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या संस्था तसेच व्यक्ती यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवान्तीत करीत असते. या वर्षाचा म्हणजेच २०२१-२२ चा जीवन गौरव पुरस्कार हा बुलडाणा अर्बनचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांना देण्यात येणार आहे. हा पुरस्कार वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये प्रदान करण्यात येणार आहे. तसेच या सभेत आ. श्वेताताई महाले व चित्तरंजन राठी विभाग संघचालक रा.स्व. संघ हे उपस्थित राहणार आहेत. बँकेच्या हिरक महोत्सवी वर्षातील सभेस बँकेचे सर्व सन्माननीय सभासद यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त यांनी केले आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button