♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

घरोघरी तिरंगा अभियानांतर्गत मनसे जनसंपर्क कार्यालय चिखली येथे ध्वज खरेदी साठी उपलब्ध

MH 28 News Live, चिखली : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त घरोघरी तिरंगा अभियान राबविण्यात येत आहे. नागरिकांना तिरंगा ध्वज सहज उपलब्ध व्हावा यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनसंपर्क कार्यालय चिखली येथे मनसे जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे, उपजिल्हाध्यक्ष राजेश परिहार, शेतकरी सेलचे जिल्हा संघटक शैलेश गोंधणे, मनविसे जिल्हाध्यक्ष शैलेंद्र कापसे, मनशे सेलचे जिल्हाध्यक्ष प्रदीप भवर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली. सदर बैठकी मध्ये दि. १० ऑगस्ट ते १२ ऑगस्ट रोजी पर्यंत मनसेच्या वतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनसंपर्क कार्यालय चिखली येथे शासनाने ठरविलेल्या ध्वज २५ रुपये व दांडा ५रुपये असे एकूण ३० रू प्रती ध्वज प्रमाणे ध्वज विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगीतले.

यावेळी उप तालुकाध्यक्ष संदीप नरवाडे, तालुका सचिव प्रवीण देशमुख, एकनाथ खरपास, संजय दळवी, मेरा शाखाध्यक्ष वैभव पडघान, संकेत काळे, अंकित इंगळे यांसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. प्रत्येक नागरिकांच्या मनात देशभावना वृद्धिंगत करण्यासाठी घरोघरी तिरंगा अभियान स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात राबविण्यात येत असुन ज्या नागरिकांना भारतीय तिरंगा ध्वज खरेदी करायचा चिखली येथील मनसे जनसंपर्क कार्यालयावरून ध्वज खरेदी करावा असे आवाहन मनसे जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे यांनी केले आहे.तसेच स्वातंत्र्य दिनी दि. 15 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी ७:३० वाजता मनसे जनसंपर्क कार्यालय चिखली येथे ध्वजारोहण होणार आहे तरी सर्व नागरिकांनी आवर्जून उपस्थित रहावे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129