
अँड. नेहा अग्रवाल यांची इनरव्हिल क्लबच्या शहराध्यक्षपदी नियुक्ती
MH 28 News Live, चिखली : समाजातील नारी शक्तीचे संघटन करून त्याद्वारे विधायक कार्य करणाऱ्या इनरव्हिल क्लबच्या चिखली शाखेची नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली. यामध्ये अँड. नेहा संतोष अग्रवाल यांची शाखाध्यक्षपदी सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली. याबरोबरच सचिव म्हणून माजी नगरसेविका सौ. ममता शैलेश बाहेती, क्लब संवाददाता पदी सौ. सुवर्णा प्रशांत भवर आणि कोषाध्यक्ष पदावर सौ. सोनल सूरज लाहोटी आणि आंतररष्ट्रीय संवाददाता पदी सौ. मयुरी पांडे यांची नियुक्ती करण्यात आली.

सौ. कांचन वृषभ पाटील,सौ. सारिका संतोष खबुतरे, डॉ. वैशाली मनीष काळे, सौ. मंगल पांचाळ, सौ. दिपा अग्रवाल, सौ. गीता मोहन नागवाणी व सौ. स्वाती राहूल गुळवे, सौ.कशिश गोलानि, सौ. माला भडेच ,सौ.स्नेहा अग्रवाल,सौ. गायत्री पांडे, यांचा ह्या कार्यकारिणीमध्ये समावेश करण्यात आला आहे.
क्लबच्या वरिष्ठ पदाधिकारी, जिल्हाध्यक्षा सौ.गिरीशा ठाकरे, खामगाव शाखाध्यक्ष सीए स्नेहा चौधरी व सचिव श्रध्दा बडलोया,सदस्या सौ. सारिका नवघरे, सौ.कुंजन लोढाया व सौ. रंजिता अग्रवाल, यांची प्रमुख उपस्थिती होती.
जास्तीत जास्त महिलांनी या क्लब चे सदस्य होऊन सामाजिक कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन अँड. नेहा संतोष अग्रवाल यांच्याकडून करण्यात आले…



