
चैतन्य गुरुकुल शाळेतील मुलींच्या कबड्डी संघाची जिल्हास्तरावर निवड
MH 28 News Live / चिखली : क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हाक्रीडाधिकारी कार्यालय बुलडाणा जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने सवना येथे दिनांक १२ सप्टेंबर रोजी आयोजित कबड्डी सामन्यांमध्ये शाळेच्या मुलींच्या अंडर १९ संघाने उत्कृष्ट प्रदर्शन करीत अंतिम सामन्यात दणदणीत विजय प्राप्त केला आणि खामगाव येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय सामन्यात खेळायला आपली जागा निश्चित केली.
कु. अश्विनी कऱ्हाडे, कु. भक्ती वाघमारे , कु. खुशी काळे , कु.भक्ती ठेंग, कु.भाग्यश्री भानुशाली , कु.वैष्णवी झगरे , कु.भाग्यश्री पोपळघट , कु.सृष्टी आंभोरे , कु.अनवी खेडेकर कु.उर्वी इंगळे ,कु.अंकिता शिंदे व कु गायत्री म्हस्के इत्यादी विद्यार्थिनी संघात सहभागी होत्या. खेळातील त्यांच्या या कामगिरीमुळे पालक शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून जिल्ह्यास्तरीय खेळातही संघ असेच प्रदर्शन करेल अशी आशा शाळचे मुख्याध्यापक मा.श्रीतापे सर यांनी व्यक्त केली आहे .



