पीएम किसानच्या लाभासाठी केवायसी करावी. कृषी विभागाचे आवाहन
MH 28 News Live, बुलडाणा : शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरीता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेची सुरुवात केली आहे. या योजनेचा बारावा हप्ता सप्टेंबर महिन्यात देय आहे. यासाठी शेतकऱ्यांनी दि. 31 ऑगस्ट 2022 पर्यंत बँक खात्याची केवायसी करावी, असे आवाहन कृषि विभागातर्फे करण्यात आले आहे.
शेतकरी कुटुंबाला प्रतीवर्षी सहा हजार रुपये आर्थिक सहाय्य तीन टप्प्यामध्ये उपलब्ध करुन देण्यात येत आहे. या योजनेचे आतापर्यंत अकरा हप्ते शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आले आहे. तसेच बारावा हप्ता सप्टेबर २०२२ मध्ये वितरीत करण्यात येणार आहे. जिल्ह्यामध्ये ३ लाख ९१ हजार ५१० आधार प्रमाणिकरण झालेले पात्र लाभार्थी असुन यातील २ लाख ४९ हजार १६ लाभार्थ्यांच ई-केवायसी झाले आहे. उर्वरित १ लाख ४२ हजार ४९४ केवायसी बाकी आहे. पात्र लाभार्थ्यांनी दि. ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत केवायसी पुर्ण करावी. केवायसी पुर्ण केले नसलेल्या लाभार्थ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा पुढील हप्ता देय होणार नाही. केवायसी ही आधार प्रमाणिकरण झालेल्या रजिस्टर मोबाईल नंबर वरुन करता येईल. तसेच सीएससी सेंटर, ई-महासेवा केंद्र येथूनही आधार प्रमाणिकरण करण्यात येईल, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सं. ग. डाबरे यांनी कळविले आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button