♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

डोणगाव – नेतांसा – पिंप्री सरहद्द शिवशेत रस्ता अतिक्रमण मुक्त करा. डोणगाव येथील शेतकऱ्यांची मागणी

MH 28 News Live, डोणगाव : रस्त्यांना विकासाच्या वाटा असे संबोधले जाते त्यासाठी शासन खूप मोठया प्रकरणात प्रयत्न करीत आहे मात्र तरी सुद्धा काही शेतरस्ते अजून सुद्धा अतिक्रमणामुळे बंदच आहेत एकीकडे ग्रामीण भागात शेतरस्त्यांची भूमिका गावाच्या विकासासाठी आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी महत्वाची आहे तेव्हा डोणगाव – पिंप्री – नेतांसा हा शिवरस्ता अतिक्रमण मुक्त करून द्या यासाठी मेहकर तहसीलदार संजय गर्कल यांना शेतकऱ्यांनी निवेदन दिले.

शिवशेतरस्ता, पांदण रस्ता, अशा रस्त्यांमुळे शेती विकासालाही चालना मिळते ज्याने शेती मशागतीसाठी वाहने शेती परियानंत जाऊ शकतात तर कित्येकवेळी तयार पिकाला पाऊस, गारगोंडा,अश्या गोष्टीचा तडाखा बसतो त्यावर उपाय म्हणून हरवेस्टरच्या सहाय्याने पीक वेळीच काढता येतो मात्र डोणगाव – पिंपरी सरहद , डोणगाव – नेतंसा शिव रस्त्यावर काही वर्षांपासून अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतजमिनीवरील बांध फोडून मुख्य शिवरस्ताच बंद केला आहे. त्यामुळे शिवरस्त्याला लागून शेती असलेल्या शेतकऱ्यांना शेतामध्ये ये – जा करण्यास तसेच शेतातील इतर कामे करण्यास अडथळा निर्माण होत असल्याने तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार डॉक्टर संजय गरकल यांना निवेदनातून शिव रस्ता वरील अतिक्रमण काढून रस्ता मोकळा करून द्या अशी विनंती डोणगाव येथील शेतकऱ्यांनी केली आहे.

निवेदन देताना गजानन निंबाजी पळसकर, ओमकार व्यंकटराव बाजाड, सुभाष पुंडलिकराव पळसकर, गणेश पांडुरंग लहाने, गफार खान गफुर खान, विजय निंबाजी पळसकर, दिलीप उत्तम पदमने व शेतकरी बांधव उपस्थित होते.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129