
तोतया पोलिसांनी वृध्दाला लुबाडले, चोरीचा धाक दाखवून १.५ लाखाचे दागिने घेवुन पसार
MH 28 News Live, खामगाव : आपण पोलीस असल्याची बतावणी करणार्या तीन भामट्यांनी एका वृद्ध व्यक्तीला चोरांची भीती दाखवून लुबाडल्याचा प्रकार काल खामगाव येथे घडला. या तोतया पोलिसांनी त्या वृध्दाच्या अंगावरचे सुमारे पावणेतीन लाख रुपयांचे दागिने काढून तेथून पसार झाले.
याबाबत माहिती अशी आहे की, स्थानिक भगतसिंह चौकाजवळून काल २१ सप्टेंबर रोजी दुपारी ३.४५ वाजताच्या सुमारास एक वयोवृध्द इसम जात असतांना तीन तोतया पोलिसांनी वृध्दाला हटकले व सांगितले की शहरात चोच्या व सोन्या-चांदीचे दागिने हिसकण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे आपल्या अंगावरील दागिने रुमालात बांधून आपल्याजवळ ठेवा, असा संवाद सुरु असतांनाच तोतयाचा वृध्द साथीदार तेथून पसार होत असतांना तोतयांनी त्याला हटकले व त्यालाही वृध्दासमोर तसेच सांगितले. यावेळी तोतयाच्या वृध्द साथीदाराने अंगावरील दागिने काढून तोतया पोलिसांना दिले. त्यामुळे पिडीत वृध्दाचा विश्वास बसला व त्यांनीसुध्दा आपली सोन्याची चैन, अंगठी व इतर दागिने असे अंदाजे तिन तोळे सोन्याचे दागिने (कि.अं. ५.५ लाख) तोतयांच्या स्वाधिन केले. तोतयांनी सदर दागिने रुमालात बांधून दिले. यानंतर चौघेही तेथुन पसार झाले. यानंतर वृध्दाने रूमाल उघडून पाहिले असता त्यामध्ये दागिने दिसून आले नाही त्यामुळे आपली फसवणुक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी पोलिसांना तक्रार केली असल्याची माहिती मिळाली आहे.



