
आपसातील भांडणानंतर शेलूद येथील युवकाने केली गळफास घेऊन आत्महत्या
- MH 28 News Live, चिखली : शहरालगत असलेल्या शेलूद येथे राहणाऱ्या चंद्रकांत सुरडकर या युवकाने झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. २ आँक्टोबर रोजी घडलेल्या या प्रकाराची चिखली पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली असून पुढील तपास सुरू झाला आहे.
मयताचा भाऊ उमाकांत गुलाबराव सुरडकर ( 23 ) व्यवसाय शिक्षण यांनी पोलीस स्टेशन चिखली येथे दिलेल्या फिर्यादीनुसार आई सौ. रुख्मीना व वडील गुलाबराव सुरडकर यांच्या सोबत भाऊ चंद्रकांत उर्फ चंदु गुलाबराव सुरडकर हा शेलूद येथे आपल्या घरी असताना काल दि. 30 सप्टेंबर रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास गल्लीतच राहणारे दादाराव साळवे, गजानन साळवे व नागेश साळवे हे आमचे घरी आले व ” चंदु याने आमच्या मुलीस छेडछाड केली आहे ” असे म्हणुन त्यांनी माझा भाऊ चंदु याचे तोंडात चापटा मारल्या व आम्हाला शिवीगाळ करुन आम्ही चंदुला पाहुन घेवु असे म्हणून ते निघुन गेले. त्यामुळे त्यांचे धाकाने माझा भाऊ चंद्रकांत हा घरुन कोठेतरी निघुन गेला. त्यानंतर परत रात्री आठ वाजेच्या सुमारास मी माझी आई सौ. रुख्मीनाबाई असे घरी असतांना दादाराव साळवे, गजानन साळवे व इतर आठ- दहा लोक आमचे घरी आले व चंदु कोठे आहे, आम्ही त्याला सोडणार नाही असे म्हणुन मला व माझ्या आईला लाथाबुक्कयांनी मारहाण करुन निघून गेले.
त्यानंतर साळवे कुटुंबातील लोक चंदूला शोधू लागले. दोन्ही बाजूंनी पोलीस तक्रार झाल्या. साळवे परिवाराच्या भितीने सुरडकर कुटुंबातील सदस्य त्यांच्या परीचयातील प्रशांत जेवाळ रा. गजानन नगर ( चिखली ) यांचे घरी रात्रभर थांबले. दि. 1 आँक्टोबर रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास सौ. अश्वीनी विकी भंडारे रा शेलुद यांनी उमाकांत सुरडकर यांना फोनवरुन माहीती दिली कि ” तुम्ही लवकर घरी या चंदुने तुमच्या घराचे समोरील टेकडीवरील शिक्षक काँलनीच्या बाजूला असलेल्या झाडाला फाशी घेतली आहे “. हे कळताच सुरडकर कुटुंबिय शेलूद येथे दाखल झाले. यावेळी चंद्रकात गुलाबराव सुरडकर याने बनियान व रुमालाने गळफास घेतलेला दिसला, परंतू त्याचे प्रेत लिंबाचे झाडाखाली जमीनीवर पडलेले होते.
घडलेल्या प्रकारासंदर्भात दादाराव काळुबा साळवे, गजानन काळुबा साळवे, नागेश यशवंत साळवे, शरद भास्कर साळवे, संजु सुखदेव साळवे, संपत गजानन काकफळे, गौरव दादाराव साळवे, शुभम दादाराव साळवे, मंगला दिलीप साळवे, दुर्गा शरद साळवे, संगीता नाडे, मनीषा अंकुश निकाळजे आणि अंकुश दिलीप निकाळजे यांनी आपला भाऊ चंद्रकांत सुरडकर याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले अशी फिर्याद उमाकांत सुरडकर यांनी चिखली पोलिसांकडे दाखल केली असून पुढील तपास सुरू आहे.



