
देऊळगाव कुंडपाळ येथे नवरात्रीनिमित्त कुस्त्यांची दंगल
MH 28 News Live, लोणार : नवरात्र उत्सवानिमित्त तालुक्यातील देऊळगाव कुंडपाळ येथे मंगळवार दि. ४ ऑक्टोबर २०२२ रोजी कुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात आली आहे.
स्थानिक साखर तळे देवी संस्थानचे मठाधिपती श्री श्री १००८ स्वामी चैतन्य महाराज यांचे मार्गदर्शनाखाली साखरतळे संस्थान परिसरातील नवरात्रोत्सव व होम-हवन निमित्त कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन करण्यात आले आहे. देवी होमातून गेल्यानंतर दंगलीचे रात्री ८ वाजता कुस्त्यांच्या दंगलीचे स्वामीजींच्या हस्ते श्रीफळ फोडून सुरुवात होईल. कुस्ती स्पर्धेत विजयी होणाऱ्या मल्लांना आकर्षक बक्षीस देण्यात येणार आहेत. तरी जास्तीत जास्त मल्लांनी या कुस्ती च्या दंगली मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन साखरतळे देवी संस्थानचे अध्यक्ष व माजी सरपंच केशव सरकटे यांचे वतीने करण्यात आले आहे.



