
धारतिर्थावर वयोवृद्ध भाविकाला अमानुषपणे मारहाण करणाऱ्या सुरक्षा कर्मचाऱ्यावर कारवाई करा – भूषण मापारी
MH 28 News Live, लोणार : जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ असलेल्या लोणार सरोवरच्या काठावर प्रसिद्ध वीरज धारातीर्थ येथे वयोवृद्ध भाविकास अमानुष मारहाण करणाऱ्या सुरक्षा रक्षकावर कठोर कारवाई करण्याची व विराजधारातीर्थ पूर्वीप्रमाणे भाविकांच्या सणासाठी खुली करण्याची मागणी लोणार नगरपरिषदे चे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान गटनेते भूषण मापारी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
लोणार हे जागतीक अ. दर्जाचे पर्यटन केंद्र असुन याला रामसर दर्जा प्राप्त आहे. या ठिकाणी देश विदेशातील पर्यटक येत असतात या ठिकाणी पर्यटक भावीक हे शेकडो वर्षापासून स्नानासाठी येतात येथे स्नान केल्याने पापनाश होतात अशी परंपरा आहे मागील कोरोना काळापासून या ठिकाणी कोरोना निर्बंध लावण्यात आले संपूर्ण महाराष्ट्रात सह देशात कोरोना निर्बंध शिथील करण्यात आले. परंतु स्नानासाठी बंद असलेली धार हि अदयापही खुली केली नाही लोणार पासून १४ कि.मी. अंतरावर असलेल्या श्री संत सखाराम महाराज यांची यात्रा भरते या यात्रेत भाविकांचा जनसागर उसळतो. मात्र, दर्शनाला जाण्याच्या पूर्वी पवित्र विराज धारातीर्थ पवित्र स्नान करून भाविक दर्शनाला जात असतात असेच काही भाविक है दिनांक २३ नोहेंबर २००२ रोजी धार तीर्थावर आले असता त्यांनी फक्त पवित्रधार तिर्थाचे पाणी अंगाला लावण्याची विनंती केली असता तेथील सुरक्षा रक्षकाने त्या वयोवृद्ध भाविकाला अमानुषपणे मारहान केली यामुळे भाविकामध्ये प्रचंड संतापाची लाट निर्माण झाली आहे.
अशा कृत्यामुळे लोणार सरोवर बघण्यासाठी येणारे पर्यटक हे बंद होतील व लोणार मधील रोजगार सुद्धा बंद पडतील असा या कृत्यामुळे समाज माध्यमावर लोणार शहराची बदनामी होत असून याला जबाबदार असणाऱ्या सुरक्षा रक्षक व संबंधित कर्मचाऱ्यावर कडक कारवाई करावी अशी ही मागणी निवेदनात नमूद आहे. या न्यायिक मागणीची पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय पुरातत्त्व विभागाचे वरिष्ठ अधिकारी केंद्रीय पुरातत्व मंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह संबंधित विभागाला सदर निवेदनाची प्रत दिली आहे. तरी संबंधित विभागाने तात्काळ दखल घेत संबंधित सुरक्षारक्षक व त्याला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यावर कडक कारवाई करावी व धारातीर्थ भाविकांच्या स्नानासाठी पूर्वीप्रमाणे खुले करण्याची मागणी निवेदनात नमूद आहे.



