
एड. संजीव सदार यांची भाजपा लीगल सेलच्या चिखली तालुकाध्यक्षपदी फेर निवड
MH 28 News Live / चिखली : येथील ख्यातनाम विधीज्ञ व भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते एड. संजीव सदार यांची पक्षाच्या लीगल सेलच्या तालुकाध्यक्षपदी फेर निवड करण्यात आली. पक्षाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार विजयराज शिंदे व चिखली मतदारसंघाच्या आमदार श्वेताताई महाले यांच्या हस्ते एड. संजीव सदार यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. त्यांची ही नियुक्ती त्यांनी मागील कार्यकाळात केलेल्या कार्याची पावतीच आहे असे म्हणावे लागेल.
एड. संजीव सदार हे मागील २० वर्षांपासून चिखली न्यायालयामध्ये एक उत्कृष्ट वकील म्हणून कार्यरत आहेत; याशिवाय शेती आणि सामाजिक कार्यात देखील ते आवडीने सहभाग घेत असतात. राजकीय क्षेत्रात सुरुवातीपासूनच ते भारतीय जनता पक्षात सक्रिय राहिले असून पक्षाने त्यांच्यावर लीगल सेलच्या चिखली तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली होती. ही जबाबदारी एड. सरदार यांनी पहिल्या कार्यकाळात यशस्वीपणे पार पाडल्यामुळेच त्यांना पुन्हा या पदावर फेरी नियुक्ती देण्यात आली. आपल्या पदाच्या माध्यमातून तालुक्यातील पक्ष संघटना अधिक बळकट करण्याचे कार्य संजीव सदार यांनी उल्लेखनीय रित्या केल्यामुळेच त्यांना पुन्हा या पदावर संधी मिळाली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
एड. संजीव सदर यांना फेर नियुक्तीचे पत्र नुकतेच कोलारा येथील भाजपाच्या एका कार्यक्रमात आ. श्वेताताई महाले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे, भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ प्रतापसिंह राजपूत, वारकरी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश महाराज जंवजाळ, भाजपचे तालुका अध्यक्ष डॉ कृष्णकुमार सपकाळ, भाजपाचे ज्येष्ठ नेते साहेबराव पाटील , पंजाबराव धनवे, वीरेंद्र वानखेडे आदी यावेळी उपस्थित होते. दिंगबर जाधव यांनी आपल्या नियुक्तीचे श्रेय विकासकन्या असलेल्या कर्तव्यदक्ष आ. श्वेताताई महाले यांना तसेच भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ प्रतापसिंह राजपूत , भाजपचे तालुकाध्यक्ष डॉ कृष्णकुमार सपकाळ, किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश विदर्भ संयोजक चक्रधर लांडे यांना दिले आहे. त्यांच्या या फेर नियुक्तीमुळे त्यांच्यावर भाजपाच्या किसान मोर्चाच्या हजारो कार्यकर्त्यांकडून तसेच मित्रमंडळी व हितचिंतकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.