गोपीनाथ मुंडे यांची जयंती चिखली भाजपाकडून साजरी
MH 28 News Live, चिखली : आ. श्वेताताई महाले यांचे जनसंपर्क कार्यालय असलेल्या सेवालय येथे माजी उपमुख्यमंत्री व दिवंगत केंद्रीय मंत्री स्व. गोपीनाथ मुंढे यांची जयंती साजरी करण्यात आली.
भाजपा शहर अध्यक्ष पंडीत देशमुख यांच्या हस्ते स्व गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून आणि पूजन करून अभिवादन करण्यात आले. स्व. मुंडे यांनी समाजातील सर्व घटकातील माणसं एकत्र करून शहरी चेहरा असलेल्या भाजपाला स्व. मुंडे यांनी ग्रामीण भागात रुजवले. गोपीनाथ मुंडे आणि स्व. प्रमोद महाजन यांनी भारतीय जनता पक्षाला घराघरात पोहोचण्याचे कार्य केलेले असून त्यांचे हे कार्य भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता कधीही विसरू शकत नसल्याचे प्रतिपादन भाजपा अध्यक्ष पंडित देशमुख यांनी यावेळी केली.
यावेळी भाजपा,सागर पुरोहित शहराध्यक्ष, संतोष काळे तालुकाध्यक्ष युवा मोर्चा, हरीभाऊ परिहर शहर उपाध्यक्ष भाजपा, विजय खरे, नितीन गोराडे, सागर पवार, सुरेश पाटील, कमलकिशोर लांडगे, सिध्देश्वर ठेंग, नवलसिंग इंगळे, दीपक भाकडे, सूरज थोरवे , चंद्रकांत काटकर, सुरेश इंगळे, ज्ञानेश्वरी केसकर, शोभा इनामे, विवेक गायकवाड इत्यादिची उपस्थिती होती.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button