♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

लोणार शहरातून वयोवृद्ध महिला बेपत्ता

  • MH 28 News Live, लोणार :- (राहुल सरदार) मागील पाच दिवसांपूर्वी शहरातून वयोवृद्ध महिला बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली असून या महिलेचा शोध नातेवाईकासह लोणार पोलीस स्टेशन चे अधिकारी कर्मचारी घेत आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की
मुलीच्या घरी झोपण्यासाठी जात असल्याचे कारण सांगुन वयोवृद्ध महीला गेल्या पाच दिवसापासुन घरी परतलीच नाही त्यामुळे पतीने लोणार पोलीस स्टेशन येथे वयोवृद्ध महिला हरविल्या बाबत तक्रार दाखल केल्याने लोणार पोलीस स्टेशनला मिसिंग नंबर ४२ / २०२२ नुसार हरविल्याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोणार शहरातील वयोवृद्ध महिला सिताबाई श्रावण बाजड वय ७० ही महीला आपली मुलगी बालूबाई नामदेव उबाळे यांचे घरी झोपण्यासाठी जात असल्याचे सांगुन ७ डिसेंबर २०२२रोजी सांयकाळी जाते असे पतीला सांगुन घरातुन निघुन गेली असता दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत सदर महीला ही घरी आली नाही. या महीलेचा पती मुलगा व इतर नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला असता सदर महीला आढळुन नआल्याने महीलेचा पती श्रावण बळीराम बाजड यांनी लोणार पोलीस स्टेशन येथे या तक्रार दिली असूनसदर वयोवृद्ध महीला कोठेही आढळुन आल्यास लोणार पोलीसाना कळविण्यात यावे असे आवाहन लोणार पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद आहेर यांनी केले आहे. या घटनेचा पुढील तपास तपास पोहेका रामकिसन गिते पोका गजानन डोईफोडे हे करित आहेत.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129