
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवास धामणगाव बढेच्या सरपंच जिनत शे. अलीम कुरेशी यांना केंद्र सरकारचे दिल्लीत निमंत्रण
MH 28 News Live, वसंत जगताप धामणगाव बढे : देशाची राजधानी दिल्ली येथे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त दि.११ ते १७ एप्रील दरम्यान विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे ग्राम पंचायतच्या सरपंच जिनत शेख अलीम कुरेशी यांना जिल्ह्यातून एकमेव सरपंच म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. राष्ट्रीय स्तरावरील ऐतिहासिक कार्यक्रमास जिल्ह्यातील ६ अधिकारी व दोन सरपंचांना उपस्थित राहण्याचा मान मिळाला आहे. यामध्ये धामणगाव बढे सारख्या छोट्याश्या गावच्या अल्पसंख्याक समाजातील महिला सरपंचांना देखील संधी मिळाल्यामुळे धामणगाव बढे गावासह मोताळा तालुक्यात आनंद सर्वत्र व्यक्त होत आहे.
देशाच्या स्वातंत्र्यास ७५ वर्षे पूर्ण झाल्याप्रित्यर्थ वर्षभर सबंध देशात ‘ आझादी का अमृत महोत्सव ‘ या नावाने असंख्य लहान मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. या आयोजनचा सर्वात मोठा समारंभ दिल्ली येथे दि. ११ ते १७ एप्रील दरम्यान पार पडणार आहे. यासाठी अमरावती विभागातून ११ एप्रिल रोजी २५ प्रतिनिधी तर १६ एप्रील रोजी २० प्रतिनिधीची निवड झाली आहे.
अभिमानाची बाब म्हणजे या कार्यक्रमात बुलडाणा जिल्ह्याचाही सहभाग आहे.
जिल्ह्यातून धामणगाव बढे येथील महीला सरपंच जिनत शेख अलीम कुरेशी यांना सदर कार्यक्रमात पाचारण करण्यात आले असून ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे.
दिल्ली येथील कार्यक्रमाच्या उपस्थितीसाठी अमरावती विभागीय आयुक्तांकडून मिळालेल्या पत्रानुसार दि. ११ एप्रील रोजी बुलडाणा जिल्ह्यातून निवड झालेल्यामध्ये एस. एस. इंगळे, गटविकास अधिकारी पं.सं.देउळगाव राजा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पं. प्रतिनिधी, एम. एम. राठोड,जिल्हा आरोग्य अधिकारी, सी.एस.राजपूत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पावस्व ), ए. एल. रामरामे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (मवाक) व धामणगाव बढेच्या महीला सरपंच जिनत शेख अलीम कुरेशी यांची निवड झाली. याशिवाय दि. १६ एप्रील रोजीच्या निवडीत कु. स्नेहल गजानन माने कार्यकारी अभियंता ल. पा. जि. प., शिवशंकर भारसाकळे,गट विकास अधिकारी पं. सं. जळगाव जामोद, बबन तुलाराम घाडगे सरपंच डोंगर खंडाळा
यांची निवड झाली आहे.