♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

मोकाट डूकरांनी वाढवली चिखलीकरांची चिंता, पालिका प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी

MH 28 News Live, चिखली : ” स्वच्छ शहर सुंदर शहर ” हे घोषवाक्य जरी नगर पालिकेकडून जागोजागी लिहीले गेले असले तरी पालिकेच्या कारभारातून याचा अनुभव मात्र येत नाही. उलट शहरात ठिकठिकाणी घाण साचलेली असून त्यामुळे मोकाट डूकरांचा सुळसुळाट झाला आहे. या डूकरांमुळे शहरात रोगराई फैलण्याची भीती निर्माण झाली असून या डूकरांमुळे अपघाता होत असल्याने मोकाट डूकरांनी चिखलीकरांची चिंता वाढवली असून पालिका प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिक करत आहेत.

लोकनिर्वाचित नगरसेवकांची मुदत संपून जवळपास एक वर्ष पूर्ण झाले तरी अद्यापही निवडणूक घेण्यात आली नाही. परिणामी सध्या मुख्याधिकारी आकाश सुरडकर हे प्रशासक म्हणून नगर पालिकेचा कारभार पाहात आहेत. आजवर प्रशासक या भूमिकेतून त्यांनी ठिकठाक कामगिरी बजावली असली तरी स्वच्छतेच्या विषयात अधिक लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. कारण, शहरातील रस्त्यालगत, गल्ली बोळात अनेक ठिकाणी कचरा साचलेला असल्याने तेथे मोकाट डूकरांचा वावर वाढला आहे. ही डूकरे कधी त्या भागातील लहान मुलांवर हल्ला करतात तर कधी रस्त्याच्या मधोमध उभी राहिल्याने अथवा धावत गेल्याने दुचाकीस्वारांचा अपघात होतो. शिवाय या डूकरांमुळे शहरात रोगराईचा फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरातील जुने गाव, भीम नगर, पंचायत समितीच्या मागील परिसरात अशा अनेक घटना घडल्या आहेत.

ही परिस्थिती लक्षात घेऊन यावर वेळीच उपाय करण्याच्या दृष्टीने नगर पालिका आरोग्य विभागाने तात्काळ पावले उचलणे गरजेचे आहे. शहरात जागोजागी साचलेला कचरा ताबडतोब उचलून मोकाट फिरणाऱ्या डूकरांचा बंदोबस्त पालिका प्रशासनाने त्वरित करावा अशी मागणी नागरिक करत आहेत.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129