
जागतिक जल दिनानिमित्त आदर्श विद्यालयात विद्यार्थ्यांनी घेतली शपथ
MH 28 News Live, चिखली : दरवर्षी २२ मार्च हा दिवस संपुर्ण जगभरात जागतिक जल दिन म्हणून साजरा केला जातो.स्वच्छ आणि ताज्या पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांची काळजी घेणे व त्यांच्या शाश्वत संरक्षणासाठी कार्यरत राहणे याचा संदेश देणे यासाठी या दिवसाची योजना केली गेली आहे. या दिनानिमित्त आदर्श विद्यालयाचे उपप्राचार्य मा. प्रमोद ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली वर्गशः सर्व विद्यार्थ्यांनी जल प्रतिज्ञा घेतली.
पाणी हे जीवन आहे. पावसाच्या पाण्याचे संकलन करण्याचे तसेच पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोताभोवतालचा परिसर स्वच्छ व सुरक्षित ठेवण्याचे सर्व विद्यार्थ्याना आवहान केले.



