♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

आदर्श कनिष्ठ महाविदयालयाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबीर संपन्न

MH 28 News Live, चिखली : स्थानिक आदर्श कनिष्ठ महाविदयालयातील राष्ट्रीय सेवा योजना +2 स्तराचे विशेष श्रम संस्कार शिबीर दत्तक ग्राम जांभोरा येथे दि. 24 डिसेंबर ते 29 डिसेंबर दरम्यान पार संपन्न झाले.

सदर विशेष शिबीराचे उद्धाटन दि. 24 डिसेंबरला पार पडले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आदर्श कनिष्ठ महाविदयालयाचे प्राचार्य भी समाधान शेळके हे होते. उद्घाटक म्हणून तर शिप्रमचे सचिव प्रेमराज भाला हे होते तर मंचावर प्रमुख अतिथी म्हणून पोलिस पाटील प्रदिप गोलांडे तंटामुक्ती अध्यक्ष पंडीत नेवरे, उपप्राचार्य प्रमोद ठोबरे, गोपाल कुलकर्णी, मिलींद हिवाळे, हार्दिका देशमुख, येल्होजी महाराज संस्थानचे सचिव जगन्नाथ इंगळे, मनोहर इंगळे, विदयार्थी प्रमुख आशिष कपुर, पूजा वैष्णव आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा सुनिल काकडे यांनी केले. तर सुत्रसंचालन कु. मनिषा नवले व कु. रुद्रायनी कुसलकर हीने तर आभार प्रदर्शन साक्षी जाधव दिने केले.

या शिबीरात ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले. या शिबीरामध्ये अनेक मान्यवरांचे बौद्धिक सत्रात मार्गदर्शन मिळाले. यामध्ये अमरावती विभागिय समन्वयक प्रा. विशाल जाधव पत्रकार योगेश शर्मा सत्य कुटे रेणुकादास मुळे यांनी मार्गदर्शन केले तसेच तहसिलदार अजितकुमार येळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मतदार नोंदणी अभियान राबविण्यात आले. त्या अंतर्गत विदयार्थ्यांनी पथनाट्याद्वारे मतदार नोदणीसाठी गावामध्ये आवाहन केले. तसेच तहसिलदार अजितकुमार येळे यांनी मतदारनोंदणी अर्जाचे वाटप केले. तेव्हा मंचावर मा. नायब तहसिलदार संजय टाके साहेब शिक्षक गणेश अंभोरे, विकास जाधव कार्यक्रम अधिकारी सुनिल काकडे आदी उपस्थित होते. या शिबीराचा समारोप दि. 29 डिसेंबर रोजी पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य समाधान शेळके हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून पोलीस पाटील प्रदिप गोलांडे, प्रा. जगदीश तांबटकर, रमेश जगताप, मिलिंद हिवाळे, सुनिता राजपुत, विनायक लोखंडे, हार्दिका देशमुख, प्रगती निमावत, गजानन साळोक, राजेश पवार आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक, कार्यक्रम अधिकारी सुनिल काकडे यांनी केले सूत्रसंचालन समीधा देशमुख व मनिषा नवले यांनी तर आभार आदित्य काशिकर याने मानले. या शिबीरासाठी सर्व शिबीरार्थी प्राध्यापक वृद, गावकरी मंडळी जांभोरा यांनी सहकार्य केले.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129