
सिल्वर ओकसमोरच्या राड्यासाठी माजी मंत्री सुबोध सावजींनी धरले यांना दोषी…
MH 28 News Live, डोणगाव : मुंबई येथे ८ एप्रिल रोजी शरद पवार यांच्या सिल्वर ओक बंगल्यावर एस टी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाच्या नावावर जो अशोभनीय राडा केला त्या राड्यात आंदोलकांच्या पेक्षा जास्त दोषी हे पोलीस यंत्रणा आहे .ज्या भागात नेहमी सुरक्षा यंत्रणा राहते अश्या भागात १०० ते १५० आंदोलक एकत्र येतात आणि त्याची कोणतीच कल्पना पोलिसांना नसणे हे बेजवाबदर पणाचे लक्षण आहे.
आंदोलने होतात व होतच राहतील अश्यात एस टी कर्मचाऱ्याचा संप चिघळत असतांना कोणीतरी चिथावणी देतो आणि एस टी कर्मचारी हे मुंबईतील अति महत्वाच्या अश्या परिसरात ज्या ठिकाणी नेहमी पोलिसांचा सुरक्षा यंत्रणेचा गराडा असतो अश्या ठिकाणी १०० ते १५० आंदोलक येतात महाराष्ट्राला काळिमा फासणारा असा भ्याड हल्ला सिल्वर ओक या ठिकाणी होणे म्हणजे सुरक्षा यंत्रणा आणि हल्लेखोर यांच्यात साठगाठ असल्याचे दिसून येते असे नसते तर अति महत्वाच्या ठिकाणी आंदोलक जमा होणे आणि पोलीस यंत्रणेला त्याची माहिती नसणे ही बाब खेदजनक असून त्या आंदोलकांच्या पेक्षा जास्त जवाबदार ही पोलीस यंत्रणा आहे पोलीस यंत्रणेची निष्काळजीने आंदोलक हे शरद पवार यांच्या बंगल्यात पोचून राळें करतात आणि त्यांना रोखण्यासाठी वेळेवर पोलीस यंत्रणा वेळेवर पोचली नाही यात सर्वात मोठी शंका ही पोलीस यंत्रणेवर आहे कारण त्यांनी कुठेतरी आंदोलकांशी हात मिळवणी केल्याने आंदोलक सिल्वर ओक परियानंत पोचले अश्या आशयाचे एक पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देऊन आंदोलकांच्या सोबतच पोलीस यंत्रणेची चौकशी करून कार्यवाही करण्याची मागणी माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी एका पत्राद्वारे केली.



