♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

विहिरीत पडलेल्या मुलीला वाचवितांना आईचा गुदमरून मृत्यू

MH 28 News Live, खामगाव : तालुक्यातील कोटी येथील रहिवासी बेबीबाई उमा खताळ (४०) व त्यांची मुलगी कु. आकांक्षा (१४) या दोघी काल १० जानेवारी २३ रोजी सकाळी कोटी शिवारातील शेतामध्ये गेल्या होत्या. दरम्यान कु. आकांक्षा ही शेतातील विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेली होती. पाणी काढत असतांना कु. आकांक्षा हीचा तोल जावून विहिरीत पडली होती. ही बाब काही वेळेनंतर बेबीबाई खताळ यांच्या निदर्शनास आली असता त्यांनी त्वरीत विहिरीकडे धाव घेऊन विहिरीत उडी मारली होती व मुलीला कसेबसे विहिरीतील पाईप पर्यंत आणत असतांना बेबीबाई खताळ यांचा दम भरला होता. कोणताही आधार न मिळाल्याने गुदमरून पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी येवून पाईपला पकडलेल्या मुलीला सुखरूप बाहेर काढले. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचली होती. पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने बेबीबाई खताळ यांचा मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला व शव विच्छेदनासाठी सामान्य रुग्णालयात पाठविला. या प्रकरणी संजय दगडु खताळ (३६) यांनी हिवरखेड पोस्टेला फिर्याद दिली. फिर्यादीवरून पोलिसांनी जाफौ कलम ५७४ नुसार मर्ग दाखल केला असुन पुढील तपास पोना गजानन आहेर करीत आहेत.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129