
श्रीराम नागरी सहकारी पतसंस्था चिखलीची २७ वी वार्षिक आमसभा संपन्न
MH 28 News Live, चिखली : श्रीराम नागरी सहकारी पतसंस्थेची २७ वी वार्षिक आम सभा राष्ट्रमाता जिजाऊ इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे दिनांक १७ सप्टेंबर रोजी संपन्न झाली. आमसभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष पंडितराव देशमुख हे होते.
श्रीराम पतसंस्था ही संस्थेचे भागधारक ठेवीदार, कर्जदार, खातेदार यांच्या भक्कम पाठिंब्यामुळेच संस्था दिवसेंदिवस प्रगती करत आहे. दि. १२ जानेवारी १९९६ संस्थेचे २९५ सभासद २९५०० भांडवल व सुरुवातीला झालेला नफा रु.४६०५/ सुरू झालेली वाटचाल आज २७ व्या वर्षात ३४९५ सभासद १०० कोटी ३२ लाखाच्या ठेवी व सुरुवातीपासून ऑडिट वर्ग ‘ अ ‘ आहे. आज रोजी संस्थेची भव्य वास्तू चिखली शहरांमध्ये दिमाखात उभी असून संस्थेने मोबाईल बँकिंग नेट बँकिंग एन ई एफ टी ,आर टी जी एस, क्यूआर कोड सेवा सुरू असून सभासदांनी या सेवांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष पंडितराव देशमुख यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले.
या प्रसंगी मंचावर संस्थेचे उपाध्यक्ष किशोर दहिवाळ, कमलकिशोर लांडगे संचालक हरिभाऊ जाधव, सुनील देशमुख, रघुनाथ पवळ, चेतन देशमुख, सतीश भंडारे, वैशाली देशमुख, चित्रा पाटील, शकुंतला बाहेकर तज्ञ संचालक राहुल ठेंग, सी ए मनीष गुरुदासानी यांच्यासह आ. श्वेताताई महाले, शि.प्र.म.चे अध्यक्ष रामकृष्णदादा शेटे ,अँड विजयकुमार कोठारी, प्रेमराज भाला, सुरेशआप्पा खबुतरे, अंकुशराव पाटील, आनंदराव हिवाळे, जगन्नाथ पाटील, राजेंद्र व्यास, रामकृष्ण शिंदे गटशिक्षणाधीकारी, विरेंद्र वानखेडे, माजी नगराध्यक्ष सुहास शेटे, सुनिताताई भालेराव, अर्चनाताई खबुतरे, बालाजी अर्बनचे संचालक गोपाल शेटे यांची उपस्थिती होती.
नीट परीक्षेमध्ये उत्कृष्ट गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच उत्कृष्ट कर्जदारांचा सत्कार यावेळी करण्यात आला. संस्थेच्या व्यवस्थापक मनीषा बोंद्रे यांनी अहवाल वाचन केले. कार्यक्रमाचे संचलन राष्ट्रमाता जिजाऊ स्कुलच्या कोमल गावंडे व प्रियंका मस्के यांनी केले तर आभार प्रदर्शन संस्थेचे तज्ञ संचालक राहुल ठेंग यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व कर्मचारी वृंद श्रीराम पतसंस्था व राष्ट्रमाता जिजाऊ इंग्लिश स्कूल यांनी परिश्रम घेतले. आमसभेला भागधारकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.



