
स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयात महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
MH 28 News Live / बुलढाणा : जिल्ह्यातील आंधरुड येथील शेवंताबाई बनसोडे यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. गावातील अतिक्रमण हटवून संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याची त्यांनी मागणी केली होती.
घटनास्थळी तैनात असलेल्या पोलिसांनी तत्परता दाखवत वेळीच हस्तक्षेप केला आणि त्यांचा जीव वाचवला. या प्रकरणी महिलेला ताब्यात घेण्यात आले असून, पुढील चौकशी सुरू आहे.
स्थानिक प्रशासनाने या घटनेची नोंद घेतली असून, संबंधित मागण्यांबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.