
आयुष्याच्या प्रत्येक परीक्षेत पास होण्यासाठी कठोर परिश्रम आवश्यक – आ. श्वेताताई महाले
MH 28 News Live, चिखली : परीक्षा मग ती कोणतीही असो ,अभ्यास केल्याशिवाय पास होता येत नाही . नाही म्हणायला कॉपी करून पास होणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. परंतु कॉपी करणारा प्रत्येक लढाईत यशस्वी होण्याची गॅरंटी नसते . परंतु जो मेहनतीच्या तिच्या जोरावर अभ्यास करून परीक्षा देत असतो तो प्रत्येक लढाईमध्ये प्रत्येक परीक्षेमध्ये यशस्वी होत असतो. परीक्षा म्हटली की ताणतणावालाच , टेन्शन आलंच. तणावात कोणतेही काम चांगले होत नाही हे विज्ञानाने सुद्धा सिद्ध केले आहे. त्यामुळेच परीक्षा देताना तणावमुक्त होऊन जर परीक्षा दिल्या गेली तर ती अधिक चांगल्या पद्धतीने दिल्या जाते आणि त्यामुळेच तणावमुक्त होऊन दिलेल्या परीक्षेचा रिझल्ट सुद्धा चांगला लागतो हीच वैज्ञानिक बाब हेरून विश्वगुरू भारताचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांनी प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थिनींनी तणावमुक्त होऊन परीक्षा द्यावी. यासाठी परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाची संकल्पना मांडली. या संकल्पनेचाच एक भाग म्हणजे एक्झाम वॉरियर चित्रकला स्पर्धा होय.
ही चित्रकला स्पर्धा घेऊन विद्यार्थीनी तणाव मुक्त होऊन व्हावं आणि येणाऱ्या त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरणाऱ्या १० वी १२ वी आणि इतर वर्गाच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी परीक्षेमध्ये चांगली कामगिरी करावी हा त्या मागचा उद्देश आहे. त्यामुळेच विद्यार्थ्यांनी तणाव मुक्त होऊन येणाऱ्या परीक्षांनाच नव्हे तर आयुष्यातील सर्वच परीक्षा देताना तणावमुक्त होऊन आणि मेहनत घेऊन दिलेली प्रत्येक परीक्षा तुम्हाला आयुष्यात यशस्वी करेल असे प्रतिपादन आमदार सौ श्वेता ताई महाले यांनी एक्झाम वॉरियर चित्रकला स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांशी हितगुज साधतांना करून पंतप्रधान यांच्या या संकल्पनेला चिखली विधानसभेतील विद्यार्थी विद्यार्थिनींनी चांगला प्रतिसाद मिळाला. त्याबद्दल सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींनी, त्यांचे पालक तसेच ज्या ज्या शाळानी या स्पर्धेत सहभाग घेतला तेथील संस्था चालक, मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षक वृंद यांचे आभार व्यक्त करून त्यांचे अभिनंदन केले.
लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमातील एक भाग म्हणून चिखली विधानसभा मतदारसंघात दि २१ जानेवारी रोजी एक्झाम वॉरियर चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत मतदार संघातील २४ शाळांनी सहभाग घेऊन जवळपास आठ सहा हजार आठशे विद्यार्थ्यांनी या चित्रकला स्पर्धेत आपल्या कलेचे प्रदर्शन केले.
सदर चित्रकला स्पर्धे मध्ये आमदार सौ श्वेता ताई महाले यांनी स्वतः आदर्श विद्यालयात जाऊन चित्रकला स्पर्धा सुरू असताना विद्यार्थी काढत असलेल्या चित्रांची पाहणी केली तसेच त्यांच्याशी हितगुज सुद्धा साधले. या एक्झाम वॉरियर चित्रकला स्पर्धेमध्ये चिखली शहरातील आदर्श विद्यालय चिखली , श्री. शिवाजी विद्यालय चिखली आदर्श कॉन्वेट, उदयनगर येथील श्री. शिवाजी विद्यालय, श्री. शहाजी विद्यालय, इसोली श्री. शिवाजी विद्यालय, एकलारा श्री. विवेकानंद विद्यालय, म.नवघरे जि.प. शाळा, कोलारा श्री. सिद्धेश्वर विद्यालय, किन्ही नाईक आश्रम शाळा अमडापूर अमर विद्यालय, सावरखेड बु., पि. सराई जनता विद्यालय , रायपूर श्री. शिवाजी विद्यालय जिजाऊ ज्ञानमंदिर, चांडोळ श्री. शिवाजी विद्यालय मासरूळ श्री. शिवाजी विद्यालय , डोमरूळ शरद पवार विद्यालय , धाड जिप व सहकार विद्या मंदीर म्हसला जि.प.शाळा , दुधा जिजामाता विद्यालय , सरस्वती विद्यालय बोरगाव काकडे, शरद पवार विद्यालय, पांगरी या शाळांचा सहभाग घेतला होता.
चिखलीचे एक्झाम वाॅरिअर्स महाराष्ट्रात नंबर वन !
पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या ‘परीक्षा पे चर्चा’ या माध्यमातून देशभरात आयोजित एक्झाम वाॅरिअर्स चित्रकला स्पर्धेत महाराष्ट्रातून सर्वाधिक संख्येने सहभागी होण्याचा विक्रम चिखली विधानसभा मतदारसंघातील विद्यार्थ्यांनी नोंदवला आहे. २४ शाळांमधील 6800 विद्यार्थ्यांच्या या उत्स्फूर्त प्रतिसाद दिला सदर परीक्षा संपूर्ण देशामध्ये घेण्यात आली आहे.
तसेच महाराष्ट्र सुद्धा परीक्षा घेण्यात आली परंतु महाराष्ट्रातून सर्वात जास्त चिखली विधानसभा मतदारसंघातील विद्यार्थी विद्यार्थ्यांनी असावी स्पर्धेसाठी नोंदणी केलेली आहे. या एक्झाम वॉरियर चित्रकला स्पर्धेसाठी 22631 एव्हढी ऑनलाईन पद्धतीने नोंदनी झालेली होती त्यात एकट्या बुलडाणा जिल्ह्यातून 5663 तर त्यातील चिखली विधान सभा मतदार संघातून तब्बल 4110 विद्यार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तसेच 2000 पेक्षा जास्त विद्यार्थी विद्यार्थ्यांनीना ऑनलाईन नोंदणी करताना अडचणी आल्याने त्यांनी नोंदणी न करता परीक्षा दिली आहे. या स्पर्धेत सहभागी शाळांमधून शाळा निहाय प्रथम, द्वितीय आणि तृतीय बक्षीस देण्यात येणार असून स्मृती चिन्ह सुद्धा देण्यात येणार आहे. शिवाय प्रत्येक सहभागी परीक्षार्थीना सहभाग प्रमाणपत्र सुद्धा देण्यात येणार आहे.
या परीक्षेच्या यशस्वीतेसाठी भाजपा तालुका अध्यक्ष डॉ कृष्णकुमार सपकाळ, शेख अनिश भाई जिल्हा अध्यक्ष भाजप अल्पसंख्यांक आघाडी,, वीरेंद्र वानखेडे जिल्हा कार्यकारणी सदस्य, अँड सुनील देशमुख, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष संतोष काळे, देविदास जाधव पाटील, माजी नगराध्यक्ष सुहास शेटे,संजय महाले , सागर पुरोहित, सुहास जामदार, विनोद सीताफळे, बंडू अंभोरे, प्रशांत पाखरे, शंकर तरमळे, डॉ राजेश्वर उबरहंडे, डॉ तेजराव नरवाडे, सिध्देश्वर ठेंग, विजय वाळेकर, अक्षय भालेराव, विष्णू वाघ, संदिप उगले आदींनी परिश्रम घेतले होते.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button