
चिखली नगरपरिषद निवडणूक २०२५ : असा आहे प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा; ३१ ऑगस्टपर्यंत नोंदवता येणार आक्षेप
MH 28 News Live / चिखली : चिखली नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रशासनिक तयारी सुरू झाली आहे. निवडणूक आयोग व प्रशासनाच्या वतीने १८ ऑगस्ट रोजी प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा जाहीर करण्यात आला. या आराखड्याची माहिती व नकाशा नगरपालिकेच्या सूचना फलकावर लावण्यात आला असून इच्छुक नागरिक त्याचा अभ्यास करू शकतात.
आक्षेप नोंदवण्याची मुदत
प्रभाग रचनेवर आक्षेप नोंदविण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत आलेल्या हरकतींचा विचार करून अंतिम आराखड्यास मान्यता दिली जाणार असल्याची माहिती नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत बिडगर यांनी दिली.
प्रभागांची रूपरेषा
जाहीर करण्यात आलेल्या प्रारूपानुसार नगरपरिषद क्षेत्रात एकूण १४ प्रभाग निश्चित करण्यात आले आहेत. प्रत्येक प्रभागासाठी लोकसंख्या, मुख्य परिसर, सीमारेषा आणि निवडून द्यावयाच्या सदस्यांची संख्या ठरविण्यात आली आहे.
प्रभाग क्र. १ : सरस्वती नगर, गवळीपुरा परिसर (लोकसंख्या ४,६३९)
प्रभाग क्र. २ : शाहू नगर, स्वामी समर्थ मंदिर परिसर (लोकसंख्या ३,८८९)
प्रभाग क्र. ३ : संत रोहिदास नगर, बाहेती जिनींग परिसर (लोकसंख्या ४,३३९)
प्रभाग क्र. ४ : माळीपुरा, जैन मंदिर, कार्तिका माता मंदिर परिसर (लोकसंख्या ४,१५९)
प्रभाग क्र. ५ : बाराभाई मोहल्ला, मदीना मस्जिद परिसर (लोकसंख्या ४,१०२)
प्रभाग क्र. ६ : देशमलपुरा, गणपती मंदिर, आदर्श विद्यालय परिसर (लोकसंख्या ४,५४९)
प्रभाग क्र. ७ : रेणुका माता मंदिर, धनगरपुरा परिसर (लोकसंख्या ४,०४५)
प्रभाग क्र. ८ : सिंधी कॉलनी, आठवडी बाजार, गांधी नगर परिसर (लोकसंख्या ४,२१५)
प्रभाग क्र. ९ : पुंडलिक नगर, शिवाजी शिक्षण संस्था परिसर (लोकसंख्या ४,५१८)
प्रभाग क्र. १० : गजानन नगर, वायरलेस, पंचशील बौद्ध विहार (लोकसंख्या ४,०१५)
प्रभाग क्र. ११ : शासकीय दुधडेअरी, रेस्टहाऊस परिसर (लोकसंख्या ४,२३२)
प्रभाग क्र. १२ : गौरक्षणवाडी, तिन पुतळा परिसर (लोकसंख्या ४,५३९)
प्रभाग क्र. १३ : नटराज टॉकीज, खडकपुरा, सावजी प्लॉट परिसर (लोकसंख्या ४,०४०)
प्रभाग क्र. १४ : तुबीनी नगर, म्हसोबा मंदिर परिसर (लोकसंख्या ३,७६३)
राजकीय हालचालींना वेग
प्रभाग रचनेचा आराखडा जाहीर होताच इच्छुक उमेदवारांनी आपापल्या क्षेत्रांचा अभ्यास सुरू केला आहे. अनेकांनी पुढील रणनीती आखण्यास सुरुवात केली असून चिखलीतील राजकीय हालचालींना आता वेग येणार आहे.