♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

त्याने वर्गातच केली गळफास घेऊन आत्महत्या… फुटले उलट सुलट चर्चेचे पेव

MH 28 News Live, जळगाव जामोद : स्थानिक महाविद्यालयातील बीकॉम फर्स्ट इयरला शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने क्लासरूम बंद असताना खिडकी मधून आत प्रवेश करून रुमालाच्या साहाय्याने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज दि. १ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबारा ते एकच्या दरम्यान उघडकीस आली. या घटनेचे वृत्त समजताच महाविद्यालयाच्या परिसरात नागरिकांनी व कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. सदर मृतक युवक जळगाव जामोद तालुक्यातील येनगाव येथील असल्याचे समजले. त्याचे नाव सुरज गावंडे ( २० वर्षे ) आहे.

सध्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू असल्यामुळे सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची परीक्षा दुपारी २ ला असल्यामुळे महाविद्यालयाचे शिपाई बेंचवर परीक्षेचे नंबर टाकण्याकरिता गेले असता खिडकीमधून त्यांचे लक्ष गळफास घेऊन लटकत असलेल्या विद्यार्थ्यांवर गेले. त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. मयताला खाली घेऊन ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सदर विद्यार्थी स्मितभाषी व मनमिळाऊ स्वभावाचा होता. कॉलेजमध्येही त्याचे सर्वांसोबत चांगले संबंध होते. मृतक सुरज गावंडे यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप करू शकले नाही.

घटनेची माहिती मिळताच जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर भास्कर, पोलीस उपनिरीक्षक नारायण सरकटे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोज खुंटे पोलीस कॉन्स्टेबल सुरज गवई यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व ग्रामीण रुग्णालय येथे जाऊन तेथील परिस्थिती हाताळून नागरिकांची गर्दी कमी केली. दरम्यान, सध्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा चालू असल्यामुळे परीक्षेच्या ताण आहे की आणखी काही कारणामुळे सुरजने आत्महत्या केली अशी कुजबुज नागरिक करीत होते. मृतक सुरज याचे शवविच्छेदन करून प्रेत कुटुंबीयांच्या हवाली करण्यात आले. पुढील तपास जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार दिनेश झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोज खुंटे करत आहेत.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129