♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

ही शपथ मतदारांच्या अखंड सेवेसाठी, उन्नतीसाठी… आ. श्वेताताई महाले यांनी घेतली विधानसभा सदसत्वाची शपथ

चिखली : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत चिखली मतदारसंघातून महायुतीच्या वतीने सलग दुसऱ्यांदा विजयी झालेल्या आमदार श्वेताताई महाले यांनी दि. ७ डिसेंबर रोजी विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली.
महाराष्ट्राच्या नव्या विधानसभेत नवनिर्वाचित सदस्यांना शपथ देण्यासाठी ७ ते ९ डिसेंबर दरम्यान मुंबई येथे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले. हंगामी अध्यक्ष कालिदास कोळमकर यांनी सर्व सदस्यांना शपथ दिली. सभागृहात चिखली मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या श्वेताताई महाले यांनी देखील आज सदस्यत्वाची शपथ घेतली.
सलग दुसऱ्यांदा विधानसभा सदस्य म्हणून शपथ घेतल्यानंतर आ. श्वेताताई महाले यांनी आपली प्रतिक्रिया माध्यमांकडे बोलून दाखवली. ” महाराष्ट्राचे कार्यक्षम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात घेतलेली ही शपथ तुमच्या अखंड सेवेसाठी आणि उन्नतीसाठी आहे. माझ्या भावांनो, बहिणींनो, मातांनो… तुमचे कल्याण आणि तुमची समृद्धी यातच माझे सौख्य सामावले आहे ” अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129