
अवकाळी पावसाने झोपवले तूरीचे पीक. चांदूर बिस्वा व खेर्डा परिसरात सुमारे ५०० हेक्टरला फटका
MH 28 News Live, चांदूर बिस्वा : गेल्या आठवड्यात नांदुरा तालुक्यातील चांदूर बिस्वा व खोडा॔ परिसरात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस पडला. त्यामुळे या शिवारातील सुमारे ५०० हेक्टरवरील तूर पिकाचे अतोनात नुकसान झाले.
मागील आठवड्यात दि. 17 डिसेंबर रोजी या भागात अकस्मात ढगाळ वातावरण निर्माण होऊन जोरदार पाऊस झाला. या अवकाळी पावसाने तूरीच्या पिकाला चांगलेच झोडपले. जोरदार झालेल्या या पावसामुळे चांदूर बिस्वा आणि खेर्डा परिसरातील सुमारे ५०० हेक्टरवरील तूरीचे पीक अक्षरशः झोपले असून या आसमानी संकटामुळे या भागातील शेतकरी पुरता हतबल झाला आहे. या संकटातून सावरण्यासाठी शासनाने झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून भरीव मदत द्यावी अशी मागणी येथील शेतकरी करत आहेत.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button