
दि चिखली अर्बन विद्यानिकेतन शाळेत वेशभूषा व नृत्य स्पर्धांचे आयोजन
MH 28 News Live, चिखली : दि चिखली अर्बन विद्यानिकेतन शाळेमध्ये वेशभूषा ,नृत्य स्पर्धा नुकत्याच घेण्यात आल्या. स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा स्पर्धेमध्ये व नृत्य स्पर्धेत आपला सहभाग नोंदविला होता. दि चिखली अर्बन विद्यानिकेतन शाळेमध्ये ३ फेब्रुवारी व ४ फेब्रुवारी या दिवशी विद्यार्थ्यांसाठी वेशभूषा स्पर्धा व नृत्य स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते .लहान मुलांमध्ये स्टेज डेरिंग वाढावे हा या स्पर्धे मागील उद्देश होय.
या स्पर्धांमध्ये शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला होता. या कार्यक्रमाला शाळेचे अध्यक्ष सतीश गुप्त, शाळेच्या पालक संचालिका ज्योत्स्ना गुप्त , चिखली अर्बन बहुउद्देशीय संस्था यांचे सचिव आशुतोष गुप्ता, शाळेच्या शैक्षणिक संचालिका पूजा गुप्ता ,शाळेचे प्राचार्य गौरव शेटे तसेच परीक्षक म्हणून आदर्श विद्यालयाचे कलाशिक्षक अनिल अंभोरे, शिवाजी शाळेचे कला शिक्षक संजय काकडे सर तसेच नृत्य स्पर्धेचे परीक्षक म्हणून अँड. गीता भोजवानी व जिनल भोजवानी त्यावेळी उपस्थित होते.
वेशभूषा स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांना थीम देण्यात आली होती .त्यामध्ये विद्यार्थ्यांनी थोर समाज सुधारक, सामाजिक संदेश ,एक्ट्रेस व ऍक्टर यांची वेशभूषा ,वैज्ञानिकांची वेशभूषा, पर्यावरण वाचवा यावर आधारित वेशभूषा तसेच थोर महापुरुष यावर याप्रमाणे त्यांना थीम देण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा यांच्या माध्यमातून सामाजिक संदेश दिला. अशा प्रकारे द चिखली अर्बन विद्यानिकेतन शाळेमध्ये नृत्य स्पर्धा व वेशभूषा स्पर्धा उत्साहात पार पडल्या.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button