
पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या वाढदिवसानिमित्त जळगाव जामोदमध्ये झाले मैराथॉन स्पर्धा
MH 28 News Live, जळगाव जामोद : जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव जामोद तालुका व शहर कार्यकरणीच्या वतीने भव्य मैराथॉन स्पर्धेच आयोजन स्थानिक दुर्गा चौक जळगाव जामोद येथे करण्यात आले होते. दुर्गा चौक पासून ५ किमी अंतर धावन्याच्या शर्यतीमध्ये मूल आणि ३ किमी अंतर मुलींसाठी ठेवण्यात आली होती. मुलांसाठी प्रथम बक्षीस ७७७७,द्वीतीय बक्षीस ५५५५,तृतीय बक्षीस ३३३३ तर मुलींसाठी प्रथम बक्षीस ३०००,द्वितीत बक्षीस २०००,तृतीय बक्षीस १००० होते.कार्यक्रमाचे उद्घाटक राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस प्रसेनजीतजी पाटिल यांनी डॉ.शिंगणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूना खेळाडूवृत्ती जोपासण्याचे प्रतिपादन यावेळी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ढोकने, मुख्य संयोजक रमेश पाटिल, मुख्य अतिथी वर्षाताई वाघ हे होते. स्पर्धेच्या आयोजनामध्ये डाबरे सर, दीपक देशमुख, येऊल सर, संतोष देविकार, वैभव बावस्कार, पंजाब म्हसाळ, रोहित गवई, बंटी वानखड़े, इमरान खान, यांचे विशेष योगदान लाभले.
तालुकाध्यक्ष प्रमोद सपकाळ,ता. कार्याध्यक्ष महादेव भालतड़क, शहराध्यक्ष अजहर देशमुख, शहर कार्याध्यक्ष संजय ढगे यांच्याहस्ते योगदान देणाऱ्या सर्व मान्यवारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस संदिप उगले,युवक जिल्हा कार्याध्यक्ष पराग अवचार,अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष एम.डी.साबीर, शेख जावेद, डॉ.प्रशांत दाभाडे, वेरुळकर ताई, सविताताई देशमुख, बंडू वाघ, संजय देशमुख, समाधान निलजे, देविदास पारस्कर, भागवत वाघ, संतोष वेरुळकर, गजानन रोठे, गजानन भालतड़क, ईरफान खान, सुहास वाघ, आशिष वायझोड़े, दत्ता डिवरे, संदीप ढगे, सुरेश पाचपोर, दादाराव धंदर, प्रमोद गई, मोहसिन खान, निलेश ढोकने, संजय दंडे, नितीन उगले, सुनील गायकी, महादेव वानखड़े, ताहेर मारी, सिद्धु हेलोडे, योगेश घोपे, निखील पार्थीकर, विष्णू रोठे, योगेश बोराखडे, निलेश पळस्कार, मंगेश वाघ यांच्यासह हजारो लोकांची उपस्थिती होती.



