
करिअरची सुवर्णसंधी ! …बँक ऑफ बडोदा घेऊन आली थेट भरती”… बँक ऑफ बडोदामध्ये थेट भरतीची मेगा संधी !
MH 28 News Live : देशातील अग्रगण्य सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदा लोकल बँक ऑफिसर्स पदांसाठी थेट भरती करत आहे. असिस्टंट मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर, एव्हीपी यांसारख्या प्रतिष्ठित पदांसाठी ५ वर्षांच्या करार पद्धतीने नियुक्ती होणार असून, कामगिरी समाधानकारक असल्यास कराराचा कालावधी आणखी ५ वर्षांनी वाढू शकतो.
🔹 एकूण पदे: ३३०
🔹 पदनिहाय रिक्त जागा:
असिस्टंट मॅनेजर – MSME Sales: ३०० पदे
(अजा – ४५, अज – २२, इमाव – ८१, ईडब्ल्यूएस – ३०, खुला – १२२)
पात्रता:
१ जुलै २०२५ रोजी कोणत्याही शाखेतील पदवीधर.
पदव्युत्तर पदवी/एमबीए/पीजीडीएम धारकांना प्राधान्य.
MSME फिनान्स किंवा IIBF, NISM कडील क्रेडिट सर्टिफिकेशन लाभदायक.
असेट सेल्स क्षेत्रातील किमान २ वर्षांचा अनुभव आवश्यक.
वयोमर्यादा:
२२ ते ३२ वर्षे (आरक्षणानुसार शिथिलता लागू).
वेतन:
पात्रता, अनुभव आणि मागील पगारानुसार आकर्षक वेतन.
निवड प्रक्रिया:
शैक्षणिक अर्हता आणि अनुभवाच्या आधारे इंटरव्ह्यू किंवा इतर प्रक्रियेद्वारे निवड.
अर्ज शुल्क (जीएसटीसह):
अजा/अज/अपंग/माजी सैनिक/महिला – ₹१७५/-
इतर उमेदवार – ₹८५०/-
नेमणुकीचे ठिकाण:
देशभरातील कोणत्याही बँक शाखेत.
📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख: १९ ऑगस्ट २०२५
🌐 अर्ज येथे करा: www.bankofbaroda.co.in – Career → Current Opportunities विभागातून.