♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

श्री गजानन महाराज सेवा समितीतर्फे चिखली येथे प्रकटदिनाचे आयोजन

MH 28 News Live, चिखली : दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी सद्गुरू समर्थ श्री गजानन महाराज सेवा समितीच्या वतीने दि. ११ तेक्ष१३ फेब्रुवारी दरम्यान श्रींच्या प्रगट दिनोत्सवाचे आयोजन श्री उदासिन महाराज मठ जुने गांव चिखली येथे करण्यात आले आहे. या तीन दिवसीय उत्सव सोहळ्यामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम सादर करण्यात येत आहेत.

शनिवार, दि. ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजता श्री गजानन महाराजांच्या मुखवट्यास अभिषेक, ९ : ३० वाजता श्री. चोपडे गुरुजी यांच्या नेतृत्वात गीता पाठ, ११ : ३० वाजता श्री. हनुमान चालिसाचे सामूहिक पठण, सायंकाळी ६ वाजता हरीपाठ आणि रात्री ८ वाजता ह. भ. प. शिवानंद महाराज, कळमनुरी यांचे किर्तन, रविवार, दि. १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजता अभिषेक, सकाळी ८ वाजता श्री गजानन विजय ग्रंथाचे एकदिवसीय सामुहिक पारायण,
व्यासपीठ नेतृत्व. भ. प. श्री शालीग्राम महाराज मुसारी मलगीकर, सायंकाळी ६ वाजता हरीपाठ, रात्री ८ वाजता ह. भ. प. श्री सतीश महाराज डोईफोडे, वझर आघाव ता.लोणार यांचे किर्तन आणि सोमवार, दि. १३ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजता श्री गजानन महाराजांच्या मुखवट्यास अभिषेक, सकाळी ८ ते दुपारी ३ वाजेपर्यंत “श्री” ची संपूर्ण चिखली नगरीतून भव्य शोभायात्रा, दुपारी २ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत ह. भ. प. पू.१००८ योगीराज दयानंद महाराज श्री नवनाथ आश्रम शेलगांव प्रमुख उपस्थिती ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ विश्वस्त श्री विठ्ठल रुख्माई संस्थान पंढरपुर तथा मुख्य मार्गदर्शक श्री गजानन महाराज सेवा समिती यांच्या शुभहस्ते महाप्रसादाचे वितरण करण्यात येईल.

वरील सर्व कार्यक्रमांसाठी भाविकांनी उपस्थिती लावावी आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री गजानन महाराज सेवा समिती, चिखली व श्री रोकडा हनुमानजी भजनी मंडळ, चिखली यांनी केले आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129