
संत गजानन महाराज यांचा आज १४५ वा प्रकट दिन! दिंड्यासह लाखो भाविक शेगावात दाखल, विविधा कार्यक्रम
MH 28 News Live, शेगाव : असंख्य लोकांच श्रद्धास्थान असलेले श्री संत गजानन महाराज यांचा आज १४५ वा प्रकट दिन आहे. यानिमित्ताने बुलढाण्यातील शेगावात लाखो भक्तांची दर्शनासाठी रीघ लागलेलली पाहायला मिळत आहे. यावेळी केवळ विदर्भातुन नव्हे तर राज्यासह मध्य प्रदेशातील तसंच गुजरातमधून सुद्धा जवळपास एक हजाराच्या वर दिंड्यासह लाखो भाविक शेगावात दाखल झाले आहेत.
महाराष्ट्रातील पारंपारिक हिंदू दिनदर्शिकेनुसार, श्री गजानन महाराज प्रकट दिन दरवर्षी माघ कृष्ण पक्ष सप्तमी तिथीला किंवा माघ महिन्यातील चंद्राच्या अस्त होत असताना सातव्या दिवशी साजरा केला जातो. बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील शेगाव (Shegaon) या गावी वयाच्या विसाव्या वर्षी गजानन महाराज प्रकट झाल्याचे सांगितले जाते. ते ज्या दिवशी दिसतेल तो दिवस गजानन महाराज प्रकट दिन (Gajanan Maharaj Prakat Din) म्हणून साजरा केला जातो. या दिवशी शेगावच्या गजानन मंदिरात मोठा उत्सव साजरा केला जातो. महाराजांना वंदन करण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आणि देशाच्याही विविध भागांतून लोक येतात.
संत गजानन महाराज १८७८ मध्ये वयाच्या ३० व्या वर्षी शेगाव इथे पहिल्यांदा दिसून आले होते. गजानन महाराज प्रकट दिन हा एक शुभ दिवस मानला जातो. या दिवशी शेगाव येथून श्री गजानन महाराजांच्या मंदिरातून पालखी काढली जाते आणि त्यांच्या पादुकांचे पूजन केल्या जातात. महाराजांच्या प्रकट दिनी हजारो भक्त, लोक शेगाव येथे प्रार्थना करण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी हजेरी लावतात. हे सर्व भाविक पूजा, दान, सत्संग, प्रार्थना आणि अन्नदान यांमध्ये विशेष सहभाग नोंदवतात.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button