
लोणारमध्ये ४६ हजाराचा प्रतिबंधित गुटखा जप्त; अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई
MH 28 News Live, लोणार : अन्न व औषध प्रशासन विभागाच्या बुलढाणा कार्यालयाच्या पथकाने केलेल्या कारवाईत लोणार येथे प्रतिबंधित गुटखा विक्री प्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.


अन्न व औषध प्रशासन विभागाकडून प्राप्त सविस्तर माहिती या प्रमाणे गुरुवार (दि.१६) अन्न व औषध प्रशासन, बुलढाणा कार्यालयाचे अन्न सुरक्षा अधिकारी रवींद्र सोळंके यांनी शेगाव पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग वरील विठु माऊली किराणा दुकान, लोणार येथे सकाळी ११ वाजता अचानक छापा टाकला असता या दुकानात प्रतिबंधीत अन्न पदार्थ नजर,विमल पानमसाला,राजनिवास, जफरानी जर्दा, RJ फ्लेवर पान मसाला, RO पेवींग तंबाखू, बाजीराव गोड पान मसाला विक्री होत असल्याचे व साठवून ठेवल्याचे निदर्शनास आले.

जप्त केलेल्या या अन्न पदार्थाची एकुण किंमत ४६ हजार १५८ रुपये इतकी आहे. हा साठा जप्त करुन दुकानाचा मालक धरमचंद अमरचंद लुनिया याचे विरुद्ध लोणार पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुकानदारांविरुद्ध अन्न सुरक्षा व मानदे कायदा कलम 26 (2) (i), 26 (2) (iv),27(3)(d),27(3)(E),3(1)(22)(1),30(2)(A)इ. तसेच भा. दं. वि. चे कलम 188, 272, 273,328 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुलढाणा अन्न व औषध प्रशासन अधिकारी रवींद्र द्वारकादास सोळंके व त्यांच्या पथकाने केली आहे या घटनेचा पुढील तपास लोणार पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद आहेर लेखनिक अनिल शिंदे करीत असून या घटनेमुळे अवैध गुटखा विक्री करण्याचे धाबे दणाणले असून यापुढेही असेच कारवाई करण्यात येण्याचा ही इशारा. संबंधित अधिकाऱ्यांनी दिला आहे.



