♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

प्रेमीयुगलाच्या पलायनाने वडनेर भोलजी येथे दोन समाजात तणाव. दगडफेक, जाळपोळ केल्याप्रकरणी ४७ जणांविरुद्ध गुन्हा

MH 28 News Live, संग्रामपूर : वेगवेगळया समाजाच्या प्रेमीयुगलाने पलायन केले. त्यात बुधवारी दुपारी अपहरणाचा गुन्हा दाखल झाला. सायंकाळी याच कारणांवरून दोन समाजात तणाव निर्माण झाला. त्यात दगडफेक व जाळपोळ करण्यात आली त्यामुळे एकच खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांनी ४७ जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे. आज गुरुवारी गावांत तणावपूर्ण शांतता आहे.

 

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, नांदुरा तालुक्यातील मौजे वडनेर भोलजी येथील १८ वर्षीय तरुणीला फुस लावून पळवून नेल्याची तक्रार पोलिसांत करण्यात आली. त्या अनुषंगाने नांदुरा पोलिसांनी अक्रम अक्तर बेग, अक्तार अकबर बेग, मुख्तार अकबर बेग, बाबा अकबर बेग अशा चार जणांविरुद्ध बुधवारी दुपारी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. या घटनेत बुधवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास वेगळे वळण प्राप्त झाले. त्यात दोन समाजातील असंख्य नागरीकांनी एकमेकांवर दगडफेक केल्याचा प्रकार घडला. एवढ्यावर न थांबता जातीयवाचक नारेबाजी करून तीन ते चार मोटार सायकल व दुकानांची जाळपोळ करण्यात आल्याने तणाव निर्माण झाला होता.

 

या प्रकरणी पोलिसांनी पोहेका संजय निंबोळकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नाना कळसकर, मोहन अग्रवाल, निंबाजी वसतकर, उज्ज्वल गव्हाळ, मंगेश वानखेडे, शिवा वाघ, अमोल वारुळकर सह ३० ते ३५ व बाबा मिझी, मुख्तार मिर्झा बाबा कलामचा मुलगा गुड्डू, असलम बेग, अक्तर बेग, मुनावर बेग, निसार बेग, मुकरम बेग, मुजम्मील बेग सह १० ते १२ अशा एकूण ४७ जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या ८ जणांना अटक केली. त्यांना मोताळा न्यायालयात हजर करण्यात आले. आज गुरुवारी सर्व आरोपींना १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीचे आदेश दिले आहेत. त्यांची रवानगी बुलधणा कारागृहात करण्यात आली आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या घटनेनंतर बुधवारी रात्री वडनेर भोलजी परिसरात दहशत निर्माण झाली होती. आज गुरुवारी परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129