शिवजयंती निमित्त महिलांच्या मोटार सायकल रॅलीने चिखली शहर गेले दुमदुमून
MH 28 News Live, चिखली : दि १९ फेब्रुवारी हा हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिन. या निमित्ताने चिखली शहरात भव्य मोटार सायकल रॅली काढण्यात आल्याने या मोटार सायकल रॅलीने संपुर्ण चिखली शहराचे वातावरण शिवमय होऊन गेले होते. या मोटार सायकल रॅलीत आ. श्वेताताई महाले या सहभागी झाल्या होत्या. त्यांनी पूर्ण रॅलीत स्वतः मोटार सायकल चालवून इतर महिला भगिनींना उत्साह वाढविला.
माता भगिनींचा सन्मान करणारे आणि त्यांचे रक्षण करणारे स्वराज्य संस्थापक शिवछत्रपतींचा आज जन्मदिन. अवघ्या मराठी मुलखात आजचा दिवस दिवाळी दसर्यासारखा उत्साहात साजरा होतो. कारण छत्रपती केवळ राजे नव्हते तर प्रजेचे व शेतकर्यांचे कनवाळू पालकही होते. भूतलावरील अशा या अद्वितीय कर्तृत्ववान राजांच्या जयंतीनिमित्त चिखली शहरात आज महिलांच्या वतीने बाईक रॅली काढून महाराजांना अभिवादन करण्यात आले. या वेळी शिवभक्त व महिला भगिनी अपूर्व उत्साहात आणि मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाल्या होत्या.
या मोटार सायकल रॅलीत शेकडोने सहभागी महिलांनी डोक्यावर भगवे फेटे बांधलेले होते तसेच त्यांच्या मोटार सायकल वाह नावर भगवे ध्वज जय भवानी जय शिवराय, जय जिजाऊ जय शिवराय अशा घोषणांनी चिखली नगरी दुमदुमून गेली होती. सदर रॅलीला छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून छ्त्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जयस्तभ चौक, सिमेंट रोड ,बैल जोडी, चिंच परिसर,जूनेगाव, टिळक नगर, राउत वाडी, खामगांव चौफुली, बस स्टँड परत छ्त्रपती शिवाजी महाराज चौकात येऊन रलीचा समारोप झाला .
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button