
महिलांच्या सक्षमीकरणाचे चिखली अर्बनचे कार्य उल्लेखनीय : आ. श्वेताताई महाले
MH 28 News Live, चिखली : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून कर्ज घेतल्यानंतर कर्जाचा विनियोग योग्य पद्धतीन केल्यानंतर या कर्जदारांना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळा अंतर्गत व्याजाचा परतावा देणात आला आहे. ज्या कर्जदारांनी आपले कर्ज नियमीत ठेवले आहे. व ज्यांना कर्जाच्या व्याजाच्या रकमेचा परतावा नियमीत प्राज झाला आहे. बँकेने केलेले कार्य खरोखर उल्लेखनीय असल्याचे प्रतिपादन आ.श्वेताताई महाले यांनी या सोहळ्याला संबोधीत करताना केले.
बुलडाणा जिल्यातील चिखली अर्बन बँकेच्या ग्राहकासाठी ग्राहक संवाद व सत्कार मेळावा चिखली अर्बन बँकेने दि. 24 फेब्रुवारी रोजी रानवारा सिसॉर्ट जाफ्राबाद रोड चिखली येथे आयोजीत करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त हे होते तर उदघाटन म्हणून आ. श्वेता महाले पाटील तसेच चिखलीचे तहसिलदार अनिलकुमार येळे यांची प्रमुख उपस्थिती होती. या संवाद व सत्कार सोहळ्याच्या प्रारंभी 107 महिलांना 85 लाखांचे कर्ज वाटप बचत गट कर्ज योजनेच्या माध्यमातून करण्यात आले.
तसेच या योजने अंतर्गत लाभार्थि तसेच चिखली अर्बन बँकेला अडचणींचा सामना करावा लागत असेल तर त्यांच्या समस्या आपण शासन दरबारी सोडविण्याचा पूर्ण प्रयत्न करू अशी ग्वाही दिली. या वेळी चिखली अर्बन बँकेने केलेले कार्य मराठा तरुणांसाठी कश्या पद्धतीने संजीवनी ठरलेले आहे. या बाबत जिजाऊ प्रतिष्ठान देऊळगावराजा तर्फे प्रा. प्रसाद देशमुख यांनी आपले अनुभव कथन करताना सांगीतले. तसेच शिवशंभू संघटना महाराष्ट्र राज्य मराठवाडा प्रदेशाध्यक्ष सूर्यप्रकाश पाटील यांनी अशाच पद्धतीचे कार्यक्रम मराठवाडा परिसरात देखील घ्यावा अशी मागणी बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त यांचेकडे करून बँकेच्या कार्याची व अध्यक्ष सतीश गुप्त यांची प्रशंसा केली. त्याच्या कार्यशैली बाबत गौरव उदगार काढले.
लाभार्थी कर्जदार ग्राहकांचा सत्कार संपन्न झाल्यानंतर, प्रोत्साहनपर युवा उद्योजक म्हणून रणजीत देव्हडे यांचा यावेळी सप्कार करण्यात आला. उद्योग उभारताना सतीशजींचे नेहमी मार्गदर्शन लाभत आले आणि ते माझ्यासाठी अतिशय मोलाचे ठरले अशा भावना रणजीत देव्हडे यांनी यावेळी व्यक्त केली. अध्यक्षीय भाषण करताना मंचावरून उपस्थित ग्राहक वर्गास रितसर विविध ठेव तसेच कर्ज योजनांची माहिती दिली. तसेच ठेवीदारांचा बँकेवर असलेला विश्वास दृढ आहे या बाबत समाधान व्यक्त केले आपल्या शाखेशी संवाद साधून योजनांची सर्व माहिती जाणून घ्यावी अशी विनंती उपस्थित ग्राहक वर्गास केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बँकेचे संचालक मनोहर खडके यांनी केले. या मेळाव्यास आ. डॉ संजय कुटे , आ. आकाश फुंडकर यांनी भेट दिली. मंचावर पंडीतराव देशमुख, रामदासभाऊ देव्हडे, रामदास बीडकर, राजेश व्यवहारे, विश्वनाथ जीतकर, राजेंद्र शेटे, सुनीता भालेराव, अशोक पाटील, नरेंद्र लढ्ढा, अर्चना खबुतरे, विजय शिसोदिया, गोविंद गिनोडे, विजय चुनावाले, डॉ. आशुतोष गुप्ता व सरव्यवस्थापक शशांक पंधाडे प्रामुख्याने उपस्थित होते.