राधेश्याम चांडक यांना ‘ब्रम्ह मित्र’ पुरस्कार प्रदान; नवी दिल्लीमध्ये आयोजित कार्यक्रमात झाले वितरण
MH 28 News Live, जळगाव जामोद : दिल्ली येथे पार पडलेल्या ‘ब्रह्मोद्योग’ या महाअधिवेशनात समाजातील निवडक उद्योजक आणि विशेष सामाजिक योगदान देणाऱ्या महानुभावांचा सन्मान करण्यात आला. यावेळी बुलडाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष मा. राधेशामजी चांडक यांना ‘ब्रम्ह मित्र’ पुरस्काराने गौरवण्यात आले.
सदर कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री मा. अश्विन चौबे, खा. सी. पी. जोशी, खा. मनोज तिवारी, नवी दिल्ली येथे पार पडलेल्या ‘ब्रह्मोद्योग’ या महाअधिवेशनात समाजातील निवडक उद्योजक आणि विशेष सामाजिक योगदान देणाऱ्या महानुभावांचा सन्मान करण्यात आला. यावेळी बुलडाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष मा. राधेशामजी चांडक यांना ‘ब्रम्ह मित्र’ पुरस्काराने गौरवण्यात आले.
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे या महाअधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. मा. राधेश्यामजी चांडक यांनी बँकिंगसोबतच गेल्या ३६ वर्षांच्या अथक प्रयत्नातून हजारो हातांना काम आणि विविध समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून दिलेल्या असाधारण सामाजिक योगदानाबद्दल ‘ब्रम्ह मित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. खा.अरविंद शर्मा यांच्या हस्ते हा पुरस्कार तालकटोरा स्टेडियम दिल्ली येथे प्रदान करण्यात आला.
सदर कार्यक्रमाला बुलडाणा अर्बनचे संचालक डाॕ. किशोर केला , सुबोध कांकाणी, अॕड. जितेंद्र कोठारी, अजय सेंगर, आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष देशपांडे अनंतराव देशपांडे तसेच अ. भा. ब्राह्मण महासंघाचे सर्व पदाधिकारी आणि देशभरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button