♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

खामगाव – जालना रेल्वे मार्गाबाबत आ. श्वेताताई महाले आज सभागृहात मांडणार ‘ लक्षवेधी ‘ जिल्हावासीयांच्या आशा पल्लवित

MH 28 News Live, चिखली : बुलढाणा आणि जालना जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचा ठरणाऱ्या नियोजित खामगाव जालना रेल्वे मार्गाच्या संदर्भात लक्षवेधी सूचना आज विधानसभेमध्ये चिखलीच्या आ. श्वेताताई महाले मांडणार असून या लक्षवेधीच्या माध्यमातून राज्य सरकारकडे या सदर प्रलंबित रेल्वेमार्गाचा विषय त्या लावून धरणार आहेत. खामगाव जालना रेल्वे मार्गासाठी पहिल्यापासूनच आग्रही भूमिका घेणाऱ्या श्वेताताई महाले यांच्या या प्रयत्नामुळे राज्य सरकार खामगाव जालना रेल्वे मार्गासाठी आपला ५० % हिस्सा जाहीर करण्याची शक्यता निर्माण झाली असून परिणामी जिल्ह्यातील जनतेच्या अशा पल्लवीत झाले आहेत.

बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देणाऱ्या मात्र मागील ११२ वर्षापासून प्रलंबित असलेल्या खामगाव जालना रेल्वे मार्गासाठी रेल्वे लोकआंदोलन समितीच्या माध्यमातून मागील १७ वर्षांपासून आंदोलन सुरू आहे. चिखली मतदार संघाच्या आमदार होण्यापूर्वीही श्वेताताई महाले या आंदोलनाशी संबंधित असून खामगाव जालना रेल्वेमार्ग अस्तित्वात यावा यासाठी त्यांनी राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू ठेवला आहे. आमदार झाल्यानंतर या प्रयत्नांना अधिकच वेग आला; आणि आता उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी राज्याची सत्तासूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांच्या निकटवर्ती आमदार म्हणून ओळख असलेल्या श्वेताताई महाले यांची प्रयत्नांनी अतिशय वेगाने प्रयत्न सुरू केले आहेत. या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून सभागृहामध्ये आज लक्षवेधी सूचनाद्वारे सरकारचे या विषयाकडे त्या लक्षवेधनार आहेत.

 

आ. महाले यांची लक्षवेधी सूचना आज सभागृहात मांडली गेली तर ते एक मोठे पाऊलठरेल. श्वेताताईमहालेयांच्या  प्रयत्नांना यश येऊन राज्य सरकार द्वारे खामगाव जालना रेल्वे मार्गासाठी ५० % निधी जाहीर होण्याची आशा जिल्ह्यातील रहिवासी व्यक्त करत असून या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासामध्ये मोठी भर पडेल अशी अपेक्षा बुलढाणा जिल्ह्यातील जनता व्यक्त करत आहेत.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129