♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

टाकरखेड हेलगा येथे युवकाची आत्महत्या; गळफास लावून संपवले जीवन

MH 28 News Live, उदयनगर : येथून जवळच असलेल्या टाकरखेड हेलगा येथील राम गुंजकर वय २२ वर्षीय युवकाने फाशी घेऊन आत्महत्या केल्याची घटना २८ मार्च रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

चिखली तालुक्यातील टाकरखेड हेलगा येथील राम प्रभाकर गुंजकर या युवकाने २८ मार्च रोजी त्याच्या काकाच्या शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी प्रकाश हरिनारायण गुंजकर यांनी दिलेल्या माहितीवरून अमडापूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

पुढील तपास अमडापुर पो.स्टे.चे ठाणेदार नागेश कुमार चतरकर यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय लक्षण टेकाळे, सुमीर सिंह ठाकूर हे करत आहेत. अद्यापपर्यंत आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129