♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

आभाळाला गवसणी घालणारी महत्वाकांक्षा… खामगावचा कपील झाला २० व्या वर्षी वैमानिक

MH 28 News Live, चिखली : आजच्या घडीला अनेक तरुण आकाशात उत्तुंग भरारी घेण्याची स्वप्न पाहतात. त्यातील काहीजण आपल्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर हे सत्यात उतरवतात. शहरातील तरुणांसोबत आता गावखेड्यातील तरुणांनाही मोठी स्वप्न आपलीशी वाटू लागली आहेत. बुलढाण्यातील एका तरुणाने वैमानिक बनून ‘आकाशात भरारी’ ही उक्ती प्रत्यक्षात खरी करुन दाखविली आहे. कपील अजयकुमार अग्रवाल असे या तरुणाचे नाव आहे.

लहानपणापासूनच वैमानिक बनवण्याची इच्छा असलेल्या रजत नगरीचा कपील अवघ्या वीस वर्षांचा आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगावचा पहिला तरुण वैमानिक म्हणून तो मायदेशी परतला आहे .आता भविष्यात एअर इंडियामध्ये सेवा करण्याची त्याची इच्छा आहे.

स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील अडते अजयकुमार अग्रवाल यांचा कपिल हा एकुलता एक मुलगा आहे. कपिलने त्याचे पहिली ते चौथी पर्यंतचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून एसएसडीव्हीमधून पूर्ण केले. त्यानंतर पुढे दहावीपर्यंतचे शिक्षण इंटरनॅशनल स्कूल जळगाव येथून पूर्ण केले. तर अकरावी ते बारावीपर्यंतचे शिक्षण अकोल्यातील पाटकर कॉलेजमधून पूर्ण केले.

त्यानंतर २०२१ मध्ये त्याने वैमानिक बनण्याच्या स्वप्नाकडे धाव घेतली. पुढील शिक्षणासाठी कपिल अमेरिकेत गेला. अमेरिकेतील रोहिदास शहरातील ट्रेझल कोस्ट फ्लाईट ट्रेनिंग सेंटरमध्ये त्याने प्रवेश घेतला आणि वैमानिक बनण्याचे धडे घेऊ लागला. दीड वर्षांमध्ये २५० तास त्याने विमान चालण्याचे प्रशिक्षण घेतले.

जमिनीपासून दहा-हजार फूट उंचीपर्यंत विमान उडवणे हा आकाशातील प्रवास सुरुवातीला त्याला अत्यंत खडतर वाटत होता. पण चिकाटी आणि परिश्रम घेण्याची इच्छा असल्याने त्याने ते साध्य केले. २५० पैकी शंभर तास प्रशिक्षकाविना विमान लँड आणि टेकऑफ केले. त्यामुळे प्रशिक्षण घेताना बरेच काही शिकायला मिळाल्याचे तो सांगतो.

२८ मार्च २०२३ मध्ये अमेरिकेत कपिलचे वैमानिक बनण्याचे प्रशिक्षण पूर्ण झाले. तसा कायमस्वरूपी परवाना त्याला मिळाला. काही परीक्षा देऊन हा परवाना देशात बदलून घेता येतो. भविष्यात एअर इंडिया सेवा करण्याची आपली इच्छा असल्याचे त्याने सांगितले.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129