♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

सलग दुसऱ्या दिवशी अवैध दारूविरुद्ध 12 गुन्हे, दोन लाखाचा मुद्देमाल जप्त

MH 28 News Live, बुलडाणा : राज्य उत्पादन शुल्क विभागाने बुधवारी, दि. 26 एप्रिल रोजी अवैध दारूविक्रीविरूद्ध 12 गुन्हे नोंद केले. सलग दुसऱ्या दिवशी अवैध दारूविरूद्ध कारवाई करण्यात आली आहे. यात दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मंगळवारी, दि. 25 एप्रिल रोजी अवैध हातभट्टीवर कारवाई करून एक लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत्‍ 12 वारस गुन्हे नोंदवून 12 आरोपींसह हातभट्टी 228 लिटर, रसायन 5 हजार 156 लिटर, देशी मद्य .90 लिटर, विदेशी मद्य 1.24, असा 2 लाख 8 हजार 520 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अवैध मद्य विक्री करणाऱ्या चिखली तालुक्यातील सावखेड भोई येथील आशिर्वाद ढाबा आणि अशोका ढाबा येथे मद्यसेवन करणाऱ्या दोन ढाबा मालक आणि सहा ग्राहकांवर म. दा. का. १९४९ चे कलम ६८ व ८४ नुसार कार्यवाही करण्यात आली.

राज्य उत्पादन शुल्कच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दि. १ एप्रिल २०२३ ते दि. 27 एप्रिल २०२३ या कालावधीत एकूण 101 गुन्हे नोंदवून 97 आरोपी आणि ५ वाहनासह बिअर ८७ लिटर, देशी मद्य ३८५ लिटर, हातभट्टी 947 लिटर, विदेशी मद्य १३७ लिटर आणि सडवा 22 हजार 481 लिटर असा 13 लाख 48 हजार 910 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

जिल्ह्यातील नागरीकांनी मद्यसेवन परवाना प्राप्त करुन केवळ शासनमान्य अबकारी मद्य विक्री अनुज्ञप्त्यांमधूनच मद्य खरेदी आणि सेवन करावे. तसेच आपल्या परिसरात अवैध मद्य विक्री अथवा बनावट मद्य निर्मिती आढळल्यास विभागास टोल फ्री क्रमांक १८००८३३३३३ वर किंवा व्हॉटॲप क्रमांक ८४२२००११३३ वर किंवा excisesuvidha.mahaonline.gov.in या पोर्टलवर तात्काळ माहिती द्यावी.

जिल्ह्यातील किरकोळ व ठोक मद्य अनुज्ञाप्तीधारक यांच्या अनुज्ञाप्तीमध्ये बनावट मद्य आढळुन आल्यास त्यांची अनुज्ञाप्ती कायमस्वरुपी रद्द करण्यात येईल. तसेच मद्य बाळगताना मद्य सेवन, मद्य वाहतूक करताना अथवा मद्य विक्री करताना किंवा आपल्या जागेचा वापर अवैध ढाबा चालविण्यासाठी दिल्यास त्यावर महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ अंतर्गत कठोर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी कळविले आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129