♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

दि.चिखली अर्बन बँकेची ६४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा जितेंद्रनाथ महाराज जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित

MH 28 News Live / चिखली : दि चिखली अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेच्या वतीने सेवा कार्य करणाऱ्या सज्जन शक्तीला निवडून त्यांना प्रेरणादायी असा हा जीवनगौरव पुरस्कार देणं ही भगवंताची महापूजा आहे .बँकेच्या सोबत जोडलेल्या तमाम घटकाकडुन मिळालेला हा पुरस्कार आहे.; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांच्या तपश्चर्येतून चिखली अर्बन बँक निर्माण झाली त्या संघाच्या प्रत्येक स्वयंसेवकाची राष्ट्रभावना या पुरस्काराच्या प्रत्येक पैशामध्ये समजतो त्यामुळे तो पुरस्काराचा निधी मी राष्ट्रनिधी समजतो . हा निधी मी सामाजिक कार्याला समर्पित करीत आहे असे प्रतिपादन अंजनगाव सुर्जी येथील धार्मिक, सामाजिक, साहित्यिक, आणि सेवा असे आधुनिक उपक्रम चालविणारे प. पु. श्री श्री आचार्य १००८ श्री जितेंद्रनाथ महाराज यांनी चिखली अर्बन बँकेच्या वतीने देण्यात येणाऱ्या जीवन गौरव पुरस्कार सोहळ्यामध्ये केले. सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेली दि चिखली अर्बन को-ऑप बँक लि.चिखलीची ६४ वी आमसभा रविवारी दिनांक ३ ऑगस्ट रोजी उत्साहात संपन्न झाली.

समाजातील विविध घटकांसाठी काम करणाऱ्या व्यक्तीनां चिखली अर्बन बँकेचा जीवन गौरव पुरस्कार देण्यात येतो.यावर्षी हा पुरस्कार जितेंद्रनाथ महाराज यांना सिध्दलिंग शिवाचार्य महाराज सा.खेर्डा तसेच चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. रानवारा येथे संपन्न झालेल्या आमसभेच्या अध्यक्षस्थानी चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष श्री. सतीश गुप्त होते.

मंचावर सिध्दलिंग शिवाचार्य महाराज पलसिध्द मठ साखरखेर्डा, ह.भ.प. प्रकाश महाराज जंवजाळ, विजय कोठारी, रामकृष्णदादा शेटे, प्रेमराज भाला, विजयराज शिंदेे, शांतीलाल बोराळकर, जालिंदर बुधवत, पुरुषोत्तम दिवटे, विश्वनाथ जितकर, राजेंद्र शेटे, डॉ . गणेश मांटे, सुनीता भालेराव, मनोहर खडके, सुधाकर कुळकर्णी, राजेंद्र भाला, सुशील शेटे, शैलेश बाहेती श्याम पारीक, मंजूताई कोठारी,राजेंद्र व्यवहारे, आनंद जेठानी, अरविंद सुरंगलीकर बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे डॉ रामदास बिडकर, अशोक पाटील, नरेंद्र लढढा, डॉ.आशुतोष गुप्ता सरव्यवस्थापक शशांक पंधाडे, दादाराव तुपकर, सुशील ओस्तवाल, दीपक तुपकर, विजय चुनावाले, काशीकर , डॉ. संध्या कोठारी मंगेश व्यवहारे, पंडितराव देशमुख आशिष लढ्ढा पुरुषोत्तम धन्नावत, डॉ. देशमुख, श्रीकांत सरोदे, शीलाताई सामरे व शाखा सल्लागार हे प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त म्हणाले की, जागतिक पातळीवरील आर्थिक मंदी आणि युद्धजन्य परिस्थितीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर आलेला ताण सर्वांना माहीत आहे. या आव्हानात्मक परिस्थितीतही बँकेने समाधानकारक कामगिरी करीत आहे आजच्या काळात बँकिंग क्षेत्रात प्रचंड स्पर्धा वाढली आहे. केवळ सहकारी बँकांमध्येच नव्हे, तर व्यावसायिक आणि खासगी बँकांसोबतही स्पर्धा करावी लागत आहे. अशा स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी आणि प्रगती करण्यासाठी बँकेने अनेक उपाययोजना केल्या आहेत. यामध्ये उत्तम भागभांडवल, व्यवस्थापनात सुधारणा, सुरक्षित कर्जे देणे आणि कमी खर्चाच्या ठेवी आकर्षित करण्यावर भर देण्यात आला आहे ठेवीदार,खातेदार ,कर्जदार आणि सभासदांच्या सहकार्याने चिखली अर्बन बँकेने आर्थिक क्षेत्रात सर्वांचा विश्वास संपादन केला आहे; त्यामुळे बँकेची उत्तरोत्तर प्रगती होत आहे. संचालक मंडळ आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या प्रामाणिक कामामुळे बँकेची घोडदौड आज वेगाने सुरू आहे.

यावेळी सिध्दलिंग शिवाचार्य महाराज व प्रकाश महाराज जंवजाळ यांनी देखील मनोगत व्यक्त केले. मंचावरील मान्यवरांच्या हस्ते दहावी उत्तम गुणांनी उत्तीर्ण झालेल्या सभासदांच्या पाल्यांना व कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले. सुजित दिवटे तसेच मुग्धा खेकाळे यांनी सूत्रसंचालन केले

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129