
श्री रेणुका देवी यात्रेसाठी परवानगी द्या’ संस्थानची जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे मागणी
MH 28 News Live, चिखली : कोटी कोटी हिंदूंचे श्रद्धास्थान व चिखली शहराचे ग्राम दैवत असलेल्या श्री रेणुका मातेची यात्रा म्हणजेच वासंतिक चैत्र पौर्णिमा उत्सव १६ एप्रिलला आहे. दोन वर्षापासून कोरोना संक्रमण काळामुळे उत्सव झाले नाहीत. पण यावर्षी यात्रा व्हावी व ती निर्विघ्न पार पाडावी याकरिता श्री रेणुकादेवी संस्थानच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत. ठाणेदार अशोक लांडे यांना याबाबत निवेदन देऊन यात्रा उत्सवाबाबत अहवाल शासनाकडे पाठवण्याची विनंती केलेली आहे.

या संदर्भात श्री रेणुकादेवी ल बचानंद महाराज संस्थानतर्फे जिल्हा पोलिस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे. त्याप्रसंगी संस्थानचे विश्वस्त पंडितराव देशमुख, गोपाल शेटे, माजी आमदार राहुल बोंद्रै हे उपस्थित होते.



