♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

लोणार – लोणी रोडवर अपघात; एक ठार

MH 28 News Live,  लोणार : तालुक्यातील गंधारी येथील लक्ष्मण सेवा राठोड वय ५३ वर्ष हे कामानिमित्त गंधारी येथून लोणी मार्गे लोणारला येत असतांना समोरून भरधाव येणाऱ्या स्विफ्ट डिझायर गाडीने दि. १० मे २०२३ रोजी सकाळी १०.३० च्या सुमारास त्यांना धडक दिली, या मध्ये त्यांच्या डोक्याला व हातापायाला जबर मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना प्राथमिक उपचारासाठी लोणार येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले तेथून त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे नेण्यात आले.. तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

याबाबत हकीकत अशी की; लोणार तालुक्यातील गंधारी येथील रहिवासी व दिल्ली पोलीस मधील उपनिरीक्षक नामदेवराव राठोड यांचे बंधू लक्ष्मण सेवा राठोड वय ५३ वर्ष हे कामानिमित्त लोणारकडे येत होते. लोणार लोणी रोडवर जांबुल शिवारातील भोपाळे यांच्या शेताजवळ छत्रपती संभाजीनगरकडून कान्हेरी ता. रिसोड जिल्हा वाशीमकडे येणाऱ्या स्वीफट डिझायर भरधाव गाडीने त्यांना समोरून जबर धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्याला व हात पायाला मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले. तशा अवस्थेत त्यांना प्राथमिक उपचारासाठी लोणार येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने राठोड यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे नेण्यात आले. त्या ठिकाणी त्यांना मृत घोषित करण्यात आले. मृतकाचे चुलत भाऊ मधुकर रेवासींग राठोड यांच्या फिर्यादीवरून स्विफ्ट डिझायर वाहन क्रमांक एम एच २० एफ वाय ४१६१ विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बन्सी पवार पो का कृष्णा निकम जालिंधर मुंढे करत आहेत.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129