
आ. श्वेताताई महाले यांच्या प्रयत्नातून तीन रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी मिळाली प्रत्येकी २५ हजार रुपयांची आर्थिक मदत
MH 28 News Live, चिखली : मतदारसंघातील गोरगरिबांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेल्या आणि संकटकाळी नेहमी मदतीचा मदतीसाठी धावून जाणाऱ्या कार्यतत्पर आमदार म्हणून श्वेताताई महाले यांची सर्वत्र ख्याती आहे. त्यांच्या प्रयत्नातून आजपर्यंत गोरगरीब कुटुंबातील अनेक रुग्णांना वैद्यकीय उपचार व शास्त्रक्रियेसाठी आर्थिक मदत होऊन त्यांना एक प्रकारे नवसंजीवनी मिळाली आहे. याचाच एक भाग म्हणून दि. १२ मे रोजी चिखली मतदारसंघातील तीन रुग्णांना प्रत्येकी २५ हजार रुपयांची आर्थिक मदत वैद्यकीय उपचारासाठी करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते या मदतीच्या धनादेशांचे वितरण आ. श्वेताताई महाले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
चिखली मतदारसंघातील रुईखेड मायंबा येथील अनुसयाबाई संपत शिंदे, खैरव येथील गजानन चिंधाजी खंडागळे आणि मासरुळ येथील संदीप दादाराव कटोळे या तिघांना आमदार श्वेता ते महाले यांच्या प्रयत्नातून प्रत्येकी 25 हजार रुपयांची मदत आर्थिक मदत देण्यात आली तर यापूर्वी देखील या तीनही रुग्णांना एक एक लाख रुपये एक लाख रुपयांची मदत आमदार महाले यांच्या माध्यमातून प्राप्त झाली आहे. दि. १२ मे रोजी आयोजित युवाशक्ती करिअर मार्गदर्शन शिबिराप्रसंगी आ. धीरज लिंगाडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते आणि आय आर एस अधिकारी समीर वानखेडे या मान्यवरांच्या हस्ते तीनही रुग्णांना मदतीचा धनादेशाचे वितरण आ. श्वेताताई महाले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आले. आ. महाले यांच्या माध्यमातून मिळालेल्या या मदतीबद्दल तिनही रुग्णांनी आभार व्यक्त केले असून या मदतीतून आपल्याला आवश्यक असलेले वैद्यकीय उपचार मिळू शकतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button